Home /News /career /

Resume Tips: आधी शिक्षण की आधी अनुभव? Resume मध्ये सुरुवातीला नक्की काय लिहावं? इथे मिळेल उत्तर

Resume Tips: आधी शिक्षण की आधी अनुभव? Resume मध्ये सुरुवातीला नक्की काय लिहावं? इथे मिळेल उत्तर

जाणून घेऊया आधी शिक्षण की आधी अनुभव?

जाणून घेऊया आधी शिक्षण की आधी अनुभव?

आज आम्ही तुमहाला या प्रश्नांचं अचूक आणि परफेक्ट उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आधी शिक्षण की आधी अनुभव?

मुंबई, 11 जानेवारी: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण नोकरीसाठी कंपन्यांमध्ये Resume देत आहेत. चांगली नोकरी मिळावी (How to get a good job) म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा (How to make good Resume) असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला (How to make impressive resume) की नोकरी पक्की होते. पण हाच Resume तयार करताना नक्की कसा (How to make Resume) तयार करावा. यात आधी कोणती गोष्ट लिहावी आणि शेवटी गोष्ट (How to manage Resume) लिहावी याबाबत अनेकांना संभ्रम असतो. काही लोकं चुकीच्या पद्धतीनं Resume लिहितात त्यामुळे त्यांना जॉब मिळू शकत नाही. बरेचदा Resume तयार करताना उमेदवार दोन गोष्टींमध्ये संभ्रमात असतात. एक म्हणजे अनुभव नक्की कुठे लिहावा (where to mention Education and Experience in Resume) आणि शिक्षणाविषयी माहिती (How to mention education in Resume) कुठे लिहावी. आधी अनुभव लिहावा की शिक्षण? पण आता टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुमहाला या प्रश्नांचं अचूक आणि परफेक्ट उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आधी शिक्षण की आधी अनुभव? Success Tips: सुपर ट्रेंडिंग IT क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग 'या' स्मार्ट टिप्स येतील कामी; एकदा वाचाच शिक्षणाविषयी ही माहिती लिहा Resume तयार करताना शिक्षणाविषयी माहिती लिहायला विसरू नका. शिक्षणाविषयी लिहिताना शक्य असल्यास टेबल फॉरमॅटमध्ये शिक्षणाविषयी माहिती लिहा. सुरुवातीला कोर्स, बोर्ड, पास झाल्याचं वर्ष, कॉलेज किंवा शैक्षणिक संस्थेचं नाव आणि त्यानंतर मिळालेले गुण लिहा. लक्षात ठेवा सुरुवातीला तुम्ही शिकत असलेल्या किंवा अलीकडच्या काळात शिक्षण पूर्ण केलेल्या कोर्सविषयी माहिती लिहा. त्यानंतर डिग्री, त्यानंतर बारावी किंवा डिप्लोमा आणि त्यानंतर सर्वात शेवटी दहावीबद्दल माहिती लिहा. अनुभवाविषयी ही माहिती आवश्यक तुम्ही काम करत असलेल्या मागील कंपनीबद्दल आणि तिथल्या कामाच्या कालावधीबद्दल लिहा. जर तुम्हाला कुठल्या इंटर्नशिपचा अनुभव असे तर तिथे नक्की काय काम केलत ते मोजक्या शब्दात लिहा. अनुभव लिहिताना मागील कंपनीतील पोस्ट लिहिण्यास विसरू नका. नोकरी करताना तुम्ही कुठले स्पेशल कोर्सेस केले असतील तर याबद्दल लिहायला विसरू नका. आधी शिक्षण की आधी अनुभव लक्षात ठेवा जर तुम्ही फ्रेशर असाल आणि तुमच्याकडे कुठलाही अनुभव असेल Resume पहिल्यांदा तयार करत असला तर सर्वात आधी अप्लाय शिक्षणाबद्दल माहिती लिहा. शिक्षांबद्दल माहिती लिहिताना गाडी सुटसुटीत आणि स्पष्ट कळेल अशा भाषेत लिहा. फ्रेशर्सना जॉब हा फक्त शिक्षणाच्या आधारे मिळतो त्यामुळे स्वतःचे मार्क्स तिथे नक्की लिहा. Exam Tips: अवघ्या एक महिन्यात होणार परीक्षेचा संपूर्ण अभ्यास; जाणून घ्या अभ्यासाच्या मास्टर टिप्स याउलट जर तुम्ही अनुभवी असाल, या आधीही तुम्ही कुठे नोकरी केली असेल किंवा तुम्हाला मोठा नौभाव असेल तर Resume मध्ये सुरुवातीला अनुभव लिहिण्यास विसरू नका. ज्यांना अनुभव आहे अशा व्यक्तींसाठी शिक्षण महत्वाचं राहत नाही तर अनुभव मोठा असतो. म्हणूनच तुमच्या पदानुसार आणि अनुभवानुसार Resume मध्ये बदल करा.
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या