मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! आता NEET द्वारे नाही मिळणार 'या' कोर्सला प्रवेश; ऐन प्रक्रिया सुरु असताना बदलला नियम

मोठी बातमी! आता NEET द्वारे नाही मिळणार 'या' कोर्सला प्रवेश; ऐन प्रक्रिया सुरु असताना बदलला नियम

NEET द्वारे नाही मिळणार 'या' कोर्सला प्रवेश

NEET द्वारे नाही मिळणार 'या' कोर्सला प्रवेश

आता NEET द्वारे इथे प्रवेश घेता येणार नाहीये. पण यामुळे नक्की विद्यार्थ्यांचं काय नुकसान होईल? किंवा आता प्रवेश कसा मिळेल? हे जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 28 नोव्हेंबर: बीएससी नर्सिंग प्रवेश घेणाऱ्या किंवा हेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीएससी नर्सिंग प्रवेश 2022 ची प्रक्रिया काही काळापूर्वी सुरू झाली आहे. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या मध्यावर प्रवेश नियमात बदल करण्यात आला आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वानुसार B.Sc नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET आवश्यक होती तसंच B.Sc नर्सिंगसाठी, NEET मध्ये किमान 50 पर्सेंटाइल असणे आवश्यक आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बीएस्सी नर्सिंग प्रवेश 2022 इयत्ता 12 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता NEET द्वारे इथे प्रवेश घेता येणार नाहीये. पण यामुळे नक्की विद्यार्थ्यांचं काय नुकसान होईल? किंवा आता प्रवेश कसा मिळेल? हे जाणून घेऊया.

राज्यातील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशाची पहिली फेरी सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. बीएससी नर्सिंगच्या एकूण 6,030 जागांपैकी 1200 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अशा परिस्थितीत आता आपले प्रवेश रद्द होणार की काय, अशी भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे.

महिन्याचा 2,40,000 रुपये पगार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब; SAIL मध्ये बंपर भरतीची घोषणा

आता कसे होणार प्रवेश?

अहवालानुसार, बीएससी नर्सिंग कौन्सिलिंग फेरी 1 मध्ये आधीच झालेल्या प्रवेशांना त्रास होणार नाही. उर्वरित जागांसाठी नवीन निकष लागू होतील. यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल अर्थात महा सीईटी सेलच्या वेबसाइटवर पुन्हा नोंदणी करावी लागेल. या संदर्भात सविस्तर माहिती महाराष्ट्र सीईटी वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देऊन तपासता येईल.

MPSC Recruitment: थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; तब्बल 623 जागांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक

प्रायव्हेट नर्सिंग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन (PNSCMA) ने महाराष्ट्र सीईटी सेलने जून 2022 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले. राज्यातील बीएस्सी नर्सिंग कोर्सचे प्रवेश भारतीय नर्सिंग कौन्सिलने जारी केलेल्या पात्रता निकषांवर आधारित असतील, असे त्या परिपत्रकात म्हटले होते.

या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीएससी नर्सिंग प्रवेश 2022 नीट यूजी ऐवजी बारावीच्या गुणांच्या आधारे घेण्याचा निर्णय दिला. रविवारी, असोसिएशनने समुपदेशन सत्राद्वारे महाविद्यालये आणि उमेदवारांना बदललेली प्रक्रिया समजावून सांगितली.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Medical exams