मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career Tips: उमेदवारांनो, पुरातत्व विभागात आहेत करिअरच्या अनेक संधी; कसे व्हाल Archaeologist? वाचा

Career Tips: उमेदवारांनो, पुरातत्व विभागात आहेत करिअरच्या अनेक संधी; कसे व्हाल Archaeologist? वाचा

आज आम्ही तुम्हाला Archaeologist नक्की कसं व्हावं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला Archaeologist नक्की कसं व्हावं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला Archaeologist नक्की कसं व्हावं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मुंबई, 09 मे:  सृष्टीत इतक्या गूढ गोष्टी लपल्या आहेत की त्यांना मोजणंही शक्य नाही असं म्हणतात. अनेक मोठमोठ्या वास्तू, अनेक किल्ले, अनेक जुनी प्राचीन शहरं, अनेक जुनी जहाजं या जगात असतात. मात्र अनेकदा याबद्दल मानवाला काही माहिती नसतं. अशा गोष्टी शोधून काढणं खूप जोखमीचं आणि महत्त्वाचं काम असतं. जर तुम्हालाही अशा काही विषयांमध्ये आवड असेल तर तुम्ही Archaeologist बनू (How to become Archaeologist) शकता. आज आम्ही तुम्हाला Archaeologist नक्की कसं व्हावं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आर्कियोलॉजी म्हणजे नक्की काय?

जमीन, पाणी आणि इतर स्त्रोतांमध्ये सापडलेले अवशेष किंवा इतर सामग्रीच्या माध्यमातून मानवी जीवनाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, मानवी जीवन समजून घेणे आणि संस्कृतीची अचूक माहिती मिळवणे हा त्यामागील हेतू आहे.

तरुणांनो, Indian Army मध्ये भरती व्हायचंय? मग कोणत्या परीक्षा असतात IMP? वाचा

शैक्षणिक पात्रता (Eligibility to become Archaeologist)

विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून विज्ञान शाखेत प्रवेश केलेला असावा आणि तो चांगल्या गुणांसह बारावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच इतिहासाची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

शिक्षणाचे काही पर्याय (education in Archaeology)

यामध्ये डिप्लोमा करायचा असेल तर भारतीय आर्कियोलॉजी डिप्लोमा करता येतो. त्याचबरोबर पदव्युत्तर डिप्लोमाबद्दल बोलायचे झाले तर आर्कियोलॉजी डिप्लोमा करता येतो. यासंदर्भात पदवीपूर्व अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत, ज्यामध्ये बीए अभ्यासक्रमात भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्राचा पर्याय आहे. त्याचा दुसरा पर्याय म्हणजे बीए - पुरातत्व आणि संग्रहालयशास्त्र यामध्ये पदवी घेता येते.

यामध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेता येते. MA – आर्कियोलॉजी, MA – प्राचीन भारतीय इतिहास आणि आर्कियोलॉजी आणि MSc – आर्कियोलॉजी यांचा समावेश आहे. तर डॉक्टरेट करायचे असेल तर एनशियेंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्कियोलॉजी यामध्ये करता येऊ शकतं.

Retirement झालं म्हणून आयुष्य संपत नाही; 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअरची सुरुवात

किती मिळतो पगार (Salary of Archaeologist)

या क्षेत्रात तुमचे करिअर सुरू केल्यावर तुम्हाला सरासरी 3 ते 4 लाखांचे वेतन पॅकेज मिळते आणि काही वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर उच्च पात्रता उत्तीर्ण झाल्यावर 5 ते 8 लाखांचे वेतन पॅकेज मिळवता येते.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job