मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Interview Tips: मुलाखतीच्या वेळी पगाराबद्दल बोलताना 'या' चुका करू नका; अन्यथा व्हाल Reject

Interview Tips: मुलाखतीच्या वेळी पगाराबद्दल बोलताना 'या' चुका करू नका; अन्यथा व्हाल Reject

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

पगाराबद्दल बोलताना (Salary Discussion in Interview) अनेक उमेदवार चूक करतात आणि हातची नोकरी गमावतात

मुंबई, 27 डिसेंबर: आजकालच्या काळात कोणाच्या ओळखीमुळे किंवा गरज आहे म्हणून नोकरी (Latest jobs) मिळत नाही. नोकरी स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर (Talent) मिळवावी लागते. अनेक कंपन्यांमध्ये आधी परीक्षा (Test), ग्रुप डिस्कशन (Group Discussion) आणि त्यानंतर मुलाखत (Interview) असे टप्पे असतात. अनेक पात्र आणि होतकरू उमेदवार हे टप्पे ओलांडून फायनल interview पर्यंत पोहोचतात. यात त्यांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता असते. मात्र पगाराबद्दल बोलताना (Salary Discussion in Interview) अनेक उमेदवार चूक करतात आणि हातची नोकरी गमावतात. या चुका आहेत तरी कोणत्या? आणि यामुळे तुमची हातची नोकरी का जाऊ शकते? याबद्दलच आज आम्ही सांगणार आहोत. जेणेकरून यानंतर कोणी अशी चूक करणार नाही. चला तर मग जाणून घेऊया.

अनुभवापेक्षा जास्त पगाराची मागणी करू नका

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जितका अनुभव (Job Experience)असेल तितक्याच पगाराची मागणी करा. जर अनुभव कमी असेल तर जास्त पगाराची अपेक्षा करू नका. जर जास्त अनुभवी असाल आणि पगार कमी असेल तर याबद्दल Interview घेणाऱ्या व्यक्तीला सांगा, तसंच तुमच्या पोस्टच्या मार्केट व्हॅल्यूबद्दलही (Market Value) सांगा. पगाराबाबत जबरदस्ती करू नका किंवा अतिशयोक्ती बोलू नका.

भारतातही आता 4 दिवसांचा आठवडा? नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम? जाणून घ्या

वैयक्तिक आयुष्याबाबत बोलू नका

पगाराबद्दल बोलताना चुकूनही आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल (Personal Life) किंवा आर्थिक समस्यांबद्दल बोलू नका. यामुळे तुम्हाला फक्त पगारातच रस आहे असं कंपनीला वाटू शकतं. म्हणूनच वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यापेक्षा प्रोफेशनल पद्धतीनं निगोशिएट करा.

पगार किती मिळणार? हे विचारू नका

Interview च्या वेळी पगार हे आपलं मुख्य आकर्षण आहे असं दाखवून देऊ नका. म्हणूनच Interview दरम्यान पगार किती मिळणार? किंवा पगार किती देणार? असे प्रश्न स्वतःहून विचारू नका. यामुळे तुमचं इम्प्रेशन वाईट होऊ शकतं. म्हणूनच Interview दरम्यान जेव्हा पगाराबद्दल विचारण्यात येईल तेव्हाच याबद्दल बोला आणि निगोशिएट (Salary Negotiation) करा.

भावनिक बोलू नका

संभाषणादरम्यान आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. सतत तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टी त्यांना सांगू नका. इमोशनल साईड दाखवल्यामुळे तुम्ही कमकुवत आहात असं वाटू शकतं. म्हणूनच इमोशनल न बोलता पॉझिटिव्ह बोला. तुमच्यातील चांगले गुण सांगा.

नाही म्हणण्यास संकोच करू नका

सर्व प्रकारच्या चर्चेनंतरही जर तुम्हाला मनासारखा पगार मिळाला नाही तर कंपनीला 'नाही' म्हणण्यास संकोच करू नका. मात्र जर तुम्ही फ्रेशर असाल तर असं करू नका. अनुभव घेण्यासाठी पगारचं बंधन राहत नाही. फ्रेशर्स असूनही नाही म्हंटल्यास तुमचं इम्प्रेशन खराब होऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब