जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सावधान! तुम्हीतर 'या' वेबसाइटवरून जॉबसाठी अप्लाय केलं नाहीत ना? सरकारनं जारी केली सूचना

सावधान! तुम्हीतर 'या' वेबसाइटवरून जॉबसाठी अप्लाय केलं नाहीत ना? सरकारनं जारी केली सूचना

सावधान राहण्याचे आदेश

सावधान राहण्याचे आदेश

काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि बेरोजगारांची फसवुक करणाऱ्या एका वेबसाईट्सचा पर्दाफाश झाला आहे. सरकारनं या वेबसाइट्ससंबंधी सावधान राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑक्टोबर: आजकाल जॉब शोधण्यासाठी कुठेही न्याची गरज भासत नाही. जॉब शोडन्ह्यासाठी फोने किंवा लॅपटॉपवरून अप्लिकेशन पाठवण्याची सुविधा असते. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावरून तुम्हाला ज्या फिल्डमध्ये हवा आहे तसा जॉब मिळू शकतो. मात्र जिथे सुविधा आली तिथे त्या सुविधांचा गैरफायदा उचलणारे लोक आलेच. अशाच काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि बेरोजगारांची फसवुक करणाऱ्या एका वेबसाईट्सचा पर्दाफाश झाला आहे. सरकारनं या वेबसाइट्ससंबंधी सावधान राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या संपूर्ण शिक्षा अभियानाच्या अधिकृत वेबसाइटच्या नावाने बनावट वेबसाइट चालवली जात आहे. या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या पोस्टवर सरकारी नोकरी मिळवून देण्याचा दावा केला जात आहे. समग्र शिक्षा या वेबसाईटच्या नावाखाली ही बनावट वेबसाईट लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) ही माहिती दिली आहे. PIB ने सांगितले की samagrashiksha.org नावाची एक बनावट वेबसाइट समग्र शिक्षा अभियान बनून नोकऱ्या मिळवण्याचा दावा करत आहे. आज नाही तर कधीच नाही; ‘या’ नॅशनल बँकेत नोकरीची संधी गमावू नका; आजची शेवटची तारीख या वेबसाइटचा भारत सरकारशी काहीही संबंध नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. योग्य माहितीसाठी, लोक संपूर्ण शिक्षा अभियानाच्या अधिकृत वेबसाइट samagra.education.gov.in ला भेट देऊ शकतात. पीआयबीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. एक फोटोही शेअर केला.

जाहिरात

वास्तविक, या बनावट वेबसाइटला भेट दिल्यावर, येथे नोकरीच्या रिक्त जागांचा तपशील दिला जात असल्याची माहिती आहे. शिक्षक भरती ते आन्सर की अशी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाइटवर लाखो नोकऱ्या रिक्त असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत लोकांनी या वेबसाइटद्वारे कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. महिन्याचा तब्बल 67,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त 10वी पास; संधी सोडूच नका; करा अप्लाय समग्र शिक्षा अभियान म्हणजे काय? खरं तर, केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये, प्री-नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची विभागणी न करता संपूर्णपणे विचार करण्याचा प्रस्ताव होता. या अंतर्गत, समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश प्री-स्कूल ते इयत्ता 12 वी पर्यंत शालेय शिक्षण तयार करणे हा होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career , fake , job , Job alert
  • First Published :
जाहिरात
जाहिरात