जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / डॉक्टरच्या चुकीच्या इंजेक्शनने ती झाली दिव्यांग, पण कुटुंबाच्या जबाबदारीने तिला 'पायावर' उभा केलं

डॉक्टरच्या चुकीच्या इंजेक्शनने ती झाली दिव्यांग, पण कुटुंबाच्या जबाबदारीने तिला 'पायावर' उभा केलं

लीलादेवी बरंडा

लीलादेवी बरंडा

एकेकाळी तिला आधाराशिवाय चालता येत नव्हते पण आज ती संपूर्ण कुटुंबाचा आधार बनली आहे.

  • -MIN READ Local18 Dungarpur,Rajasthan
  • Last Updated :

जुगल कलाल, प्रतिनिधी डूंगरपुर, 13 जून : आयुष्यात अनेक वेळा आपण वयामुळे नाही तर परिस्थितीमुळे मोठे होतो. संसाराच्या जबाबदाऱ्या आपल्यावर आल्या की घरचे लहान मूलही मोठे होते आणि जेव्हा कुटुंब सांभाळण्याची वेळ येते तेव्हा देव स्वतःच आपल्याला शक्ती देतो. आज आपण अशाच एका महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत, जी स्वतः कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय एक पाऊलही चालू शकत नाही. पण, तरी तिने हार मानली नाही. डुंगरपूर जिल्ह्यातील शिशोद गावात राहणाऱ्या लीलादेवी बरंडा या महिलेची ही कथा आहे. लीलाने आपल्या अपंगत्वाला कधीही आपली कमजोरी बनवले नाही आणि आज लीला देवी महिलांचे कपडे शिवून आपल्या मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. लीला देवी यांचे पती धुलेश्वर बरंडा हे वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम करतात. तर मुलगी रीमा दहावीत आहे आणि मुलगा सुनील हा सहावीत आहे. लीला देवीला शिलाई मशीन चालवून आपल्या मुलाला आणि मुलीला मोठा अधिकारी बनवायचा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आधाराशिवाय चालता येत नव्हते, पण आज झाली कुटुंबाचा आधार - लीला देवी जन्मतः अपंग नव्हती. ती लहानपणी एकदा आजारी पडली होती, त्यावेळी डॉक्टरांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे ती एका पायाने अपंग झाली होती. पण, मुलगा आणि मुलीची जबाबदारी लीलाच्या डोक्यावर आल्यावर लीला हिम्मत हारली नाही आणि शिवणकाम शिकली. एकेकाळी तिला आधाराशिवाय चालता येत नव्हते पण आज ती संपूर्ण कुटुंबाचा आधार बनली आहे. लीला केवळ शिवणकाम करून मुलांचे शिक्षण घेत नाही आहे तर उलट कुटुंबाची आर्थिक स्थितीही मजबूत करत आहे.

दोन दिव्यांग मित्रांना समजली लीलाची समस्या - लीला महिलांच्या ब्लाउजच्या वेगवेगळ्या डिझाइन्सही बनवते. लीलाचे धाडस पाहून इतर दिव्यांग महिलाही लीलाप्रमाणे शिवणकाम शिकत आहेत. लीला यांनी सांगितले की, संतोष कटारा आणि आपणो संस्थेचे अशोक गमेती यांनी तिला शिवणकाम शिकण्यात मदत केली आहे. संतोष आणि अशोक हे देखील दिव्यांग आहेत. संतोष भाई आणि अशोक भाई यांनी तिची काहीतरी करण्याची आवड ओळखली आणि तिला कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळेच आज ती कपडे शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे, असेही तिने सांगितले. लीला देवी हिची ही कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात