मुंबई, 19, जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी झाला आहे. निकालानंतर लगेचच काही दिवसांमध्ये ग्रॅज्युशनसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या प्रक्रियेनुसार आज म्हणजेच 19 जूनला पहिली मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पण पहिली मेरिट लिस्ट तर जाहीर झाली पण आता पुढे काय? पुढे प्रोसेस कशी असेल? हे जाणून घेऊया. मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजेस आणि शिक्षणसंस्थांमधील डिग्री फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया 27 मे ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात आली होती. या कालावधीत 2 लाख 41 हजार 532 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडे 6 लाख 67 हजार 864 अर्ज आले आहेत. JOB ALERT: राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात ग्रॅज्युएट्ससाठी पदभरतीची घोषणा; किती असेल पगार? बघा डिटेल्स पण पुढे काय? पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 20 ते 27 जून दुपारी ३ वाजेपर्यंत हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी करून शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना अर्ज केलेल्या कॉलेजेसच्याच्या संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन पहिली गुणवत्ता यादी पाहता येणार आहे. Success Story: कधीकाळी MBA करण्यासाठीही नव्हते पैसे; आज ‘हे’ आहेत 95,000 कोटींच्या कंपनीचे मालक
कार्यक्रम | महत्त्वाच्या तारखा |
---|---|
पहिली मेरिट लिस्ट | 19 जून 2023 |
| | कागदपत्रं पडताळणी आणि शुल्क भरणी | 20 जून ते 27 जून 2023 | | दुसरी मेरिट लिस्ट | 28 जून 2023 | | कागदपत्रं पडताळणी आणि शुल्क भरणी | 30 जून ते 5 जुलै 2023 | | तिसरी मेरिट लिस्ट | 6 जुलै 2023 | | कागदपत्रं पडताळणी आणि शुल्क भरणी | 7 जुलै ते 20 जुलै 2023 |
12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link कोणत्या अभ्याक्रमासाठी किती अर्ज विविध अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाकडे 6 लाख 67 हजार 864 अर्ज आले आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांपैकी कला शाखेसाठी 44 हजार 211, विज्ञान शाखेसाठी 29 हजार 588 आणि वाणिज्य शाखेसाठी 1 लाख 27 हजार 905 अर्ज दाखल झाले आहेत. तर स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या वाणिज्य शाखेतील बी.एम.एस. या अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक 1 लाख 30 हजार 930 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर विज्ञान शाखेतील बी.एस्सी. आयटी अभ्यासक्रमासाठी 88 हजार 149 अर्ज, बी.कॉम. अकाऊंट्स व फायनान्स अभ्यासक्रमासाठी 71 हजार 431 अर्ज, बी.एस्स्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमासाठी 48 हजार 874 अर्ज, कला शाखेतील बी.ए. एमएमसी अभ्यासक्रमासाठी 26 हजार 848 अर्ज, बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी 17 हजार 338 अर्ज आणि बी.कॉम. बँकिंग अँड इन्शुरन्स अभ्यासक्रमासाठी 14 हजार 16 अर्ज दाखल झाले आहेत.