• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर; या कालावधीदरम्यान करा अर्ज

10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर; या कालावधीदरम्यान करा अर्ज

राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑगस्ट: यंदा कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) रद्द करण्यात आल्या. मात्र राज्य शिक्षण मंडळांनं दहावी आणि बारावीची परीक्षा न घेता ऐतिहासिक निकाल लावण्याचं निश्चित केलं. त्यानुसार राज्याचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष मूल्यांकन पद्धतीनं हा निकाल लावण्यात आला. मात्र ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही आक्षेप आहे किंवा परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी (10th and 12th supplementary exams) करण्याच्या तारखा (10th and 12th supplementary exams application form) जाहीर केल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळानं एक पत्रक काढून पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या (10th and 12th supplementary exams dates) तारखांची घोषणा केली आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. या तारखांदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यानही विद्यार्थ्यांना अर्ज भारत येणार आहे मात्र यासाठी त्यांना विलंब शुल्क द्यावं लागणार आहे. हे वाचा - विद्यार्थ्यांनो, 11वीसाठी CET देणार असाल तर 'या' पद्धतीनं करा अभ्यास; जाणून घ्या कोणाला देता येणार पुरवणी परीक्षा राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला मात्र जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थी यांनाही ही परीक्षा देता येणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 16 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज (Online Admission Application) करता येणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मॉक डेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवार (13 ऑगस्ट) पर्यंत उपलब्ध असणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज कसा भरायचा याचा सराव करता येणार आहे. राज्यातील सहा महानगरांत अकरावीचा प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे. यासाठी 16 ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: