जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, 11वीसाठी CET देणार असाल तर 'या' पद्धतीनं करा अभ्यास; जाणून घ्या सोपी पद्धत

विद्यार्थ्यांनो, 11वीसाठी CET देणार असाल तर 'या' पद्धतीनं करा अभ्यास; जाणून घ्या सोपी पद्धत

विद्यार्थ्यांनो, 11वीसाठी CET देणार असाल तर 'या' पद्धतीनं करा अभ्यास; जाणून घ्या सोपी पद्धत

आज आम्ही तुम्हाला या परीक्षेची तयारी नक्की कशी करावी याबाबत टिप्स देणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑगस्ट: कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा (10th 12th exams 2021) होऊ शकली नाही. मात्र आता दहावी आणि बारावीचा निकाल  (10th 12th Results 2021) विशेष मूल्यांकन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आहे. दहावीनंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET (11th CET Exam date) घेण्यात येणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावरच ही परीक्षा असणार आहे. मात्र ही परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण करण्यास विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास नक्की कसा करावा (How to study for CET Exam) याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या परीक्षेची तयारी नक्की कशी करावी याबाबत टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या पद्धतीनीं लक्षात ठेवा उत्तरं लक्षात ठेवा परीक्षा जरी शंभर मार्कांची असली तरी तुम्हाला अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी काही सिम्बॉल्स (Symbols), चित्र (Sketches) किंवा काही स्मार्ट पद्धतींचा (Smart study) उपयोग करा. यामुळे तुम्ही प्रश्नांची उत्तरं कधीच विसरणार नाही. नोट्स जमा करा तुम्ही संपूर्ण वर्षभरात केलेला अभ्यास या एका परीक्षेत तुम्हाला आठवावा लागणार आहे त्यामुळे सर्व नोट्स जमा करा. विषयांनुसार त्या नोट्समधील काही महत्त्वाचे प्रश्न (Important Questions) आणि त्यांची उत्तरं थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे वाचा - युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया मुंबई इथे विविध पदांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज आत्मविश्वास ठेवा लक्षात ठेवा ही परीक्षा तुम्हाला अकरावीत चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आहे. त्यामुळे आत्मविश्वास (Confidence) महत्त्वाचा आहे. स्वतः वर विश्वास ठेऊन परीक्षा द्या. तुम्ही वर्षभरात जे शिकला आहात त्यावर आधारित ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊन नका. धैर्यानं परीक्षा द्या. विषयांचं वर्गीकरण करा या परीक्षेत तुम्हाला चार विषयांचे मिळून प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे विषयांचं वर्गीकरण करा. प्रत्येक विषयांमधील महत्त्वाच्या टॉपिक्सची यादी तयार करा. या आधीच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले होते त्याबद्दल माहिती घ्या. सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी तयार राहा या परीक्षेसाठी अभ्यास करता असताना प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर समजून वाचा, यामुळे प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्हाला त्याचं योग्य ते उत्तर देता येईल. पोपटपंची करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात