मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पूर्णवेळ नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक; Time Management पाहून थक्क व्हाल!

पूर्णवेळ नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक; Time Management पाहून थक्क व्हाल!

अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे फक्त UPSC ची तयारी करूनही परीक्षा पास होऊ शकत नाही. या तरुणीने दिवसभर नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं

अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे फक्त UPSC ची तयारी करूनही परीक्षा पास होऊ शकत नाही. या तरुणीने दिवसभर नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं

अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे फक्त UPSC ची तयारी करूनही परीक्षा पास होऊ शकत नाही. या तरुणीने दिवसभर नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षांपैंकी एक मानली जाते. यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी तयारी करतात. यात काही जणांनाच यश मिळतं. स्पर्धा परीक्षा 2020 मध्ये कर्नाटकमध्ये राहणारी अपर्णा रमेशने (Aparna Ramesh) पूर्ण वेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी केली आणि ऑल इंडियामध्ये 35 वी रँक मिळवून IAS झाली.

दुसऱ्याच प्रयत्नात मिळवलं यश

अपर्णा रमेशने दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली आहे. यापूर्वी तिने 2019 मध्येही परीक्षा दिली होती. मात्र प्राथमिक परीक्षेतही तिला यश मिळू शकलं नव्हतं. यानंतर तिने दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 35 वी रँक मिळवली.(Cracked UPSC in second attempt while full time job You will be amazed at Time Management)

पूर्ण वेळ नोकरी करून परीक्षेची तयारी करणं अवघड..

DNA च्या रिपोर्टनुसार, 28 वर्षीय अपर्णा रमेशने सांगितलं की, पूर्ण वेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी करणं सोपं नव्हतं. त्यांच्यासाठी टाइम मॅनेजमेंट सर्वात मोठं आव्हान होतं. कारण नोकरीनंतर त्यांच्याजवळ खूप कमी वेळ शिल्लक राहत होता.

हे ही वाचा-MPSC आयोगाचा पारदर्शक पाऊल, विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज!

कमी वेळा अशी केली परीक्षेची तयारी

परीक्षेसाठी अपर्णा रमेशने प्रासंगिक विषयांवर फोकस केला आणि सोबतच तिने सिव्हिल सेवा परीक्षेतील सर्व अभ्यासक्रमाचा अभ्यास केला. तिचं मुख्य लक्ष अधिक अभ्यास करणं होतं. आणि यासाठी तिने विस्तृत नोट्स तयार केले होते. यासोबतच अपर्ण व्यक्तीत्व परीक्षण करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यू करीत असे आणि कठीण परिस्थितीत विश्लेषण केलं.

पूर्ण वेळ नोकरीसह टाइम मॅनेजमेंट

अपर्णा रमेशने पूर्ण वेळ नोकरीसह परीक्षेची तयारी करण्यासाठी सकाळची वेळ निवडली. अपर्णा दररोज सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती ऑफिसला जात होती आणि संपूर्ण दिवस काम करीत असे. आपल्या आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी ती कमीत कमी 8 ते 10 तास नोकरी करीत होती. अपर्णाने सांगितलं की, मी अभ्यास करण्यासाठी नोकरी सोडण्याचा पर्याय निवडला नाही. यामुळे मी दोघांना बॅलेन्स करण्याचा प्रयत्न केला. हा माझा निर्णय होता. मी अभ्यासाची रणनिती केली आणि लक्ष केंद्रीत केलं.

सिव्हील सर्विसेस परीक्षा 2020 मध्ये अपर्णाला 1004 मार्क मिळाले आहेत. ज्यात तिला लिखित परीक्षेत 825 आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये 171 मार्क मिळाले. तिने या परीक्षेत 35 वी रँक मिळवली आणि आपलं IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

First published:

Tags: Inspiration, Karnataka, Upsc exam