मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

`ही` कंपनी कर्मचाऱ्याला नोटीस पीरियडमध्ये देते 10 टक्के पगारवाढ...

`ही` कंपनी कर्मचाऱ्याला नोटीस पीरियडमध्ये देते 10 टक्के पगारवाढ...

नोटीस पिरियडमध्ये कंपनीकडून पगारवाढ

नोटीस पिरियडमध्ये कंपनीकडून पगारवाढ

काही कंपन्यांमध्ये नोटीस पिरियडमध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलं जातं. अशा स्थितीत वेतन न मिळाल्यानं खर्च कसा भागवायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होतो. हाच प्रश्न सोडवण्यासाठी एका अमेरिकी कंपनीनं उपाय शोधला आहे.

काही लोक वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्यानं नोकऱ्या (Jobs) बदलत असतात. अलीकडच्या काळात नोकरी बदलण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. एखाद्या कंपनीत कार्यरत असताना राजीनामा दिला, तर संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस पीरियडवर (Notice Period) काही काळ त्याच कंपनीत काम अनिवार्य असतं. नोटीस पीरियड कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक मानला जातो. कारण हा कालावधी प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळा असतो. काही कंपन्यांत एक महिना, तर काही कंपन्यांत दोन ते तीन महिने नोटीस पीरियड असू शकतो. काही कंपन्यांमध्ये या काळात कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलं जातं. अशा स्थितीत वेतन न मिळाल्याने खर्च कसा भागवायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होतो. कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी एका अमेरिकी कंपनीनं अप्रतिम उपाय शोधला आहे. याबाबतची माहिती खुद्द कंपनीच्या संस्थापकाने सोशल मीडिया (Social Media) पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे या कंपनीची आणि तिच्या अनोख्या निर्णयाची जोरदार चर्चा आहे. नोटीस पीरियडमध्ये वेतन रोखलं गेल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं; पण अमेरिकेतल्या गोरिल्ला (Gorilla) नावाच्या एका मार्केटिंग कंपनीने (Marketing Company) यावर एक अनोखा उपाय शोधला आहे. आमच्या कंपनीतला कोणताही कर्मचारी नोकरी सोडून जाऊ इच्छित असेल, तर त्याला नोटीस पीरियडमध्ये दहा टक्के वेतनवाढ दिली जाईल, अशी अनोखी घोषणा गोरिल्ला कंपनीनं केली आहे. या कंपनीची स्थापना जॉन फ्रॅन्को (John Franco) यांनी केली आहे. जॉन यांनी लिंक्डइनवर (LinkedIn) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जॉन लिहितात, `ज्या क्षणी एखाद्या कर्मचारी गोरिल्ला कंपनी सोडण्याच्या त्याच्या निर्णयाची माहिती आम्हाला देतो आणि 'मी नवीन नोकरी शोधत आहे,' असं कळवतो, तसंच कोणताही फुलटाइम काम करणारा कर्मचारी आम्हाला किमान सहा आठवड्यांपूर्वी नोटीस देतो, तेव्हा त्याच्या कंपनीतल्या उर्वरित दिवसांच्या वेतनात दहा टक्क्यांनी वाढ केली जाते.` यावर एखादा कर्मचारी तुमच्या कंपनीत पुन्हा जॉइन होऊ इच्छित असेल तर, असा प्रश्न जॉन यांना विचारला असता, 'त्याचं स्वागत आहे,' असं उत्तर त्यांनी दिलं. हेही वाचा - 'बीएमसी'च्या शाळांमध्ये शिक्षकांची 810 पदं रिक्त; मराठी शाळांना हवेत 259 शिक्षक जॉन फ्रँको यांच्या मते, कंपनी सोडण्याची प्रक्रिया तणावमुक्त असावी. या कंपनीतले कर्मचारी नोकरी सोडू शकतात आणि त्याच वेळी दहा टक्के पगारवाढ मिळवून नवीन नोकरी शोधू शकतात. परंतु, यासोबत त्यांना तीन महिन्यांच्या आत कंपनी सोडावी लागेल, अशी अट ठेवण्यात आली आहे. गोरिल्ला कंपनीच्या या अनोख्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
First published:

Tags: Job, Salary

पुढील बातम्या