मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! राज्यातील कॉलेजेस 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरु; कोव्हीड नियम पाळून Offline होणार वर्ग

मोठी बातमी! राज्यातील कॉलेजेस 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरु; कोव्हीड नियम पाळून Offline होणार वर्ग

म्हणूनच राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

म्हणूनच राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

म्हणूनच राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, 25 जानेवारी:  गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टनं (Omicron cases maharashtra) जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. भारतात तिसरी लाट (Third wave in Maharashtra)आली आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. मात्र आता हळूहळू संख्या कमी होऊ लागली आहे. म्हणूनच राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची (Omicron in Maharashtra) लागण झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानुसार शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील कॉलेजसंदर्भात (Colleges reopen in Maharashtra) महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार अशी शक्यता आहे.

शासनाने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, राज्यात आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. तसंच राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे असंही नाही. त्यामुळे राज्यातील शाळांप्रमाणेच कॉलेजेसही सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Golden Chance! इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक

त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरु करावीत असा विचार शासनापुढे विचाराधीन आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच म्हणजेच येत्या 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व कॉलेजेस सुरु होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशी मान्यता शासनाकडून देण्यात अली आहे. मात्र यापुढील निर्णय हा जिल्ह्यातील महानगरपालिकांकडे सोपवण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक अशा जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बघून कॉलेजेस सुरु होणार आहेत.

काय आहे निर्णय

ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोज झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीनं उपस्थित राहता येणार आहे. मात्र ज्यांनी अजूनही कोरोना लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांना उपस्थित राह्ता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे.

विद्यापीठ किंवा महाविद्यालयांनी त्यांच्या 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घ्याव्यात आणि त्यानंतरच्या परीक्षा कोणत्या पद्धतीनं घ्याव्यात हा निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ किंवा महाविद्यालयांना असणार आहे.

First published:

Tags: Colleges closed, Corona, महाराष्ट्र