मुंबई, 9 मार्च : इंजिनीअरिंगची पदवी (बी.टेक) हा भारतातल्या सर्वांत महागड्या पदवी अभ्यासक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांना इंजिनीअर होण्याचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. भारतात अशी अनेक सरकारी महाविद्यालयं आणि विद्यापीठं आहेत, जिथे फार कमी फीमध्ये बीटेक पूर्ण करता येतं. या शैक्षणिक संस्थांचा कॅम्पस प्लेसमेंट रेकॉर्डही चांगला आहे. त्यामुळे, जेईई परीक्षा देणारे विद्यार्थी कमी फीसह सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करू शकतात. अशा काही इंजिनीअरिंग संस्थांबद्दल माहिती घेऊ या. या संस्थांमध्ये एका वर्षाची फी 50 हजार रुपयांपर्यंत आहे. 1) जादवपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता : देशातल्या सर्वोत्तम बी.टेक संस्थांमध्ये जादवपूर युनिव्हर्सिटीचा समावेश होतो. नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) 2023मध्ये ही युनिव्हर्सिटी 17व्या स्थानावर आहे. ही युनिव्हर्सिटी पश्चिम बंगालमधली एक स्टेट युनिव्हर्सिटी असून तिची स्थापना 1955मध्ये झाली आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, ‘या’ पदांसाठी होतेय भरती; असं करा अप्लाय
जादवपूर युनिव्हर्सिटीत बीटेक अभ्यासक्रमाचं एका वर्षाचं शिक्षण शुल्क सुमारे 10 हजार रुपये आहे. चार वर्षांच्या B.Tech साठी 96 हजार ते एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. जादवपूर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्यासाठी पश्चिम बंगाल संयुक्त प्रवेश परीक्षा (WBJEE-2023) द्यावी लागते.
2) महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी : बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटीत ‘फॅकल्टी ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग’ ही देशातल्या प्रमुख उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांपैकी एक आहे. या ठिकाणी विविध इंजीनिअरिंग शाखांमध्ये बीटेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या युनिव्हर्सिटीची स्थापना 1949मध्ये झालेली आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटीतल्या बीटेक अभ्यासक्रमाचं एक वर्षाचं शुल्क सुमारे 30 हजार 560 रुपये इतकं आहे. या ठिकाणी जेईई मेन परीक्षेद्वारे प्रवेश घेता येतो. 3) नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूट, हरियाणा : हरियाणात कर्नाल इथल्या नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूटची स्थापना 1955मध्ये करण्यात आली. 1923मध्ये हीच संस्था बेंगळुरूमध्ये स्थापन केली होती आणि इंपीरियल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल हजबंडरी आणि डेअरिंग म्हणून तिची ओळख होती. 1955मध्ये ही संस्था हरियाणातल्या कर्नाल येथे स्थलांतरित करण्यात आली आणि तिचं नावही बदलण्यात आलं. BAMS आणि MBBS मध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर माहिती ही संस्था डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक अभ्यासक्रम चालवते. डेअरी इंजिनीअरिंगमध्ये बीटेक करायचं असेल तर ही सर्वोत्तम संस्था आहे. नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा (एआयईईए) द्यावी लागते. या परीक्षेचं आयोजन आयसीएआरद्वारे केलं जातं. डेअरी इन्स्टिट्यूटमध्ये बीटेकची एक वर्षाची फी सुमारे 32 हजार रुपये आहे. 4) अगप्पा चेटि्टयार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तमिळनाडू : कराईकुडीमधलं हे कॉलेज एक सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज आहे. ते अण्णा युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. या ठिकाणी पाचहून अधिक स्पेशलायझेशनमध्ये बीटेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. टीएनईए या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून येथे प्रवेश मिळवता येतो. या ठिकाणी बीटेकसाठी एक वर्षाची फी 39 हजार 560 रुपये आहे. 5) जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली : ही एक प्रतिष्ठित सेंट्रल युनिव्हर्सिटी असून देशातल्या सर्वोच्च युनिव्हर्सिटीजमध्ये तिचा समावेश होतो. जामियामधल्या बीटेक कोर्ससाठी जेईई मेनद्वारे प्रवेश मिळवता येतो. तिथे बीटेक कोर्ससाठी एका वर्षाची फी 43 हजार 400 रुपये आहे. जामिया मिलियाची स्थापना 1920मध्ये अलीगढमध्ये झाली होती. स्थापनेच्या पाच वर्षांनंतरच म्हणजे 1925मध्ये ही युनिव्हर्सिटी दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली. जामिया मिलिया इस्लामियामध्ये बीटेकव्यतिरिक्त इतर अनेक अंडरग्रॅज्युएट कोर्सेस उपलब्ध आहेत.