जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / आयआयटी बॉम्बेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, 'या' पदांसाठी होतेय भरती; असं करा अप्लाय

आयआयटी बॉम्बेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, 'या' पदांसाठी होतेय भरती; असं करा अप्लाय

IIT बॉम्बे भर्ती 2023

IIT बॉम्बे भर्ती 2023

एरोस्पेस इंजिनीअरिंग, बायोसायन्स आणि बायो इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग आणि सिव्हिल इंजिनीअरिंग या विभागांमध्ये वरच्या तीन प्रकारची पदं रिक्त आहेत.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    IIT Bombay Recruitment 2023 : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी बॉम्बेने रोलिंग अ‍ॅप्लिकेशन बेस्ड पदभरती मोहिमेचं आयोजन केलं आहे. रोलिंग अ‍ॅप्लिकेशन्स म्हणजे जो तत्काळ पदासाठी अर्ज करेल, त्याला त्याचा लगेच फायदा होईल. संस्था या माध्यमातून विविध विभागांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक ही पदं भरणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार असून, अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नसेल. तसंच संस्था उमेदवारांचं वेळोवेळी मूल्यांकन करेल.

    रिक्त जागा

    एरोस्पेस इंजिनीअरिंग, बायोसायन्स आणि बायो इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग आणि सिव्हिल इंजिनीअरिंग या विभागांमध्ये वरच्या तीन प्रकारची पदं रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार अशंक देसाई सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज, सेंटर ऑफ स्टडीज इन रिसोर्सेस इंजिनीअरिंग, सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फॉर रूरल एरियाज्, सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड इंजिनीअरिंग, कोईटा सेंटर फॉर डिजिटल हेल्थ आणि सेंटर फॉर मशीन इंटेलिजन्स अँड डाटा सेंटर यासारख्या शैक्षणिक केंद्रांमध्ये अर्ज करू शकतात. आयआयटी बॉम्बे त्यांच्या सर्व शाखांसाठी अर्ज स्वीकारत असून, त्यात आयडीसी स्कूल ऑफ डिझाइन, देसाई सेठी स्कूल ऑफ एंटरप्रेन्युअरशिप आणि शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.

    BAMS आणि MBBS मध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर माहिती

    पात्रता निकष

    इच्छुक उमेदवाराने प्रथम श्रेणी किंवा आधीच्या पदवीच्या समकक्ष ग्रेडमध्ये पीएचडी मिळवलेली असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट असावं. तसंच त्याचं लेखन नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झालेलं असावं. सहायक प्राध्यापक ग्रेड 1साठी इच्छुक उमेदवाराकडे पीएचडीनंतर किमान तीन वर्षं अध्यापन, संशोधन आणि व्यावसायिक अनुभव असणे अनिवार्य आहे. उमेदवाराकडे डॉक्टरेटनंतरचा आवश्यक अनुभव नसेल, परंतु, त्याने इतर निकष पूर्ण केले असतील तर तो सहायक प्राध्यापक ग्रेड 2 पदासाठी पात्र असेल. सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पीएचडीनंतर किमान सहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. यापैकी तीन वर्षे सहायक प्राध्यापक ग्रेड 1 च्या स्तरावर किंवा कोणत्याही प्रतिष्ठित संस्था अथवा उद्योगात समकक्ष स्तरावर कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्राध्यापक पदासाठी उमेदवाराकडे पीएचडीनंतरचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यापैकी चार वर्षं सहयोगी प्राध्यापक स्तरावर किंवा प्रतिष्ठित कोणत्याही संस्थेत अथवा उद्योगात समकक्ष स्तरावर त्याने काम केलेलं असावं.

    NEET UG 2023: उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली सुरु; अशी करा नोंदणी

    अर्ज प्रक्रिया

    या पदासाठी इच्छुक उमेदवाराने प्रथम फॅकल्टी रिक्रूटमेंट ड्राइव्ह पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी iitb.ac.in या वेबसाइटवर जावं. वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, लॉग इन करून उमेदवार या पदासाठी त्यांचे रेझ्युमे, संशोधन आणि टीचिंगचा तपशील आणि संबंधित कागदपत्रं सबमिट करू शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: IIT
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात