दिल्ली, 4 मार्च : आर्टिफिशियल इंटेलीजन्सची लोकप्रिय चॅटबॉट चॅटजीपीटीने एमबीएची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र युपीएस्सी परीक्षेत चॅट जीपीटीला यश मिळालं नाही. पेनिनसिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हॉर्टन मास्टर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशनची परीक्षा चॅट जीपीटी उत्तीर्ण झाले. जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या युपीएसस्सीच्या पूर्व परीक्षेतील प्रश्न चॅट जीपीटीकडून सोडवून घेण्यात आले होते. यात २०२२ मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेचा पहिला पेपर चॅट जीपीटीला देण्यात आला होता.
एनालिटिक्स इंडियाने चॅट जीपीटीला ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिली होती. त्याआधी असंही विचारण्यात आलं होतं की, चॅट जीपीटी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते का? यावर चॅट जीपीटीने म्हटलं होतं की, एक आर्टिफिशियल लँग्वेज मॉडेल असल्यानं माझ्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. पण युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी ज्ञानासोबतच क्रिटिकल थिंकिंग, एप्लिकेशन एबिलीटी, टाइम मॅनेजमेंट यांचेही कौशल्य गरजेचे आहे. पण मी माझ्या क्षमतेनुसार योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
दररोज केला 15-16 तास अभ्यास, खेड्यातल्या मुलीनं करुन दाखवलं! झाली IAS
चॅट जीपीटीला भूगोल, अर्थव्यवस्था, इतिहास, इकॉलॉजी, सामान्य विज्ञान ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडी आणि सामाजिक बदल, राजकीय संबंधित प्रश्न विचारले होते. रिपोर्टनुसार चॅट जीपीटीने अर्थव्यवस्था आणि भूगोलाशी संबंधित प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली. तर इतिहासाशी संबंधित सोप्या प्रश्नांची उत्तेरेही देता आली नाहीत. फक्त ५४ प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटीला सोडवता आली. या परीक्षेत कट ऑफ ८७.५४ इतका होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.