Home /News /career /

राज्याच्या पर्यावरण विभागाकडून फेलोशिप; जागतिक तापमानवाढसंबंधी इंटर्नशिपची संधी, असा करा अर्ज

राज्याच्या पर्यावरण विभागाकडून फेलोशिप; जागतिक तापमानवाढसंबंधी इंटर्नशिपची संधी, असा करा अर्ज

देशाविदेशांतील मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठांतून (Renowned Universities from the world) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तसंच रिसर्च फेलो असलेल्या उमेदवारांना या विभागासोबत 6 महिन्यांची इंटर्नशिप करता येणार आहे

मुंबई 21 ऑगस्ट : जागतिक तापमानवाढ (Climate Change) ही सगळ्या जगासाठीच चिंतेचा विषय आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि निसर्गचक्र बदलतंय. या सगळ्याचा अभ्यास पर्यावरणशास्रात केला जातो. शास्रज्ञ अभ्यास करून तापमानवाढ रोखण्यासाठीचे उपाय सुचवतात. तुम्ही पर्यावरणशास्रातले पदवीधर असाल आणि तुम्हाला पुढचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाने फेलोशीप कार्यक्रम जाहीर केला आहे. या विषयातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना पर्यावरणशास्र व जागतिक तापमानवाढ या विषयासाठीची 2021-22 साठी फेलोशिप (Fellowship) देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याच्या पर्यावरण विभागाने दिली आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही9 हिंदीनं दिलं आहे. OYO मध्ये 300 जागांची भरती, कंपनीला हवेत नव्या दमाचे ‘टेक प्रोफेशनल्स’ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या या विभागाने यासंबंधी पत्रक प्रसिद्ध केलं असून त्यात सविस्तर माहिती दिली आहे. याबदद्ल माहिती देताना महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागातील (Environment Ministry) एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, देशाविदेशांतील मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठांतून (Renowned Universities from the world) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तसंच रिसर्च फेलो असलेल्या उमेदवारांना या विभागासोबत 6 महिन्यांची इंटर्नशिप करता येणार आहे. त्यासाठी विभागाने अर्ज मागवले आहेत.’ या पत्रकानुसार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘इंटर्नशिपसाठी 20 जणांना संधी मिळणार आहे त्यासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या उमेदवारांना विभागातील विविध प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या (International Organizations on environment) अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. यातून विद्यार्थ्यांना खूप शिकायची संधी उपलब्ध होणार आहेच पण प्रत्यक्ष कार्यानुभवही मिळेल.’ सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; पत्त्यावर करा अर्ज ‘या विभागाने वेस्ट मॅनेजमेंट (Waste Management), बायोडायव्हर्सिटी, रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy), जलसंधारण आणि जागतिक तापमानवाढीबद्दल जागरुकता निर्माण करणं या विषयांसाठी ही फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्याचा अभ्यास महाराष्ट्रातील शहरी तसंच ग्रामीण भागातील 3500 ठिकाणी केला जाईल. सध्याची नवी पिढी पर्यावरणाबद्दल अभ्यास करण्यास उत्सुक आहे. महाराष्ट्र राज्याच्यावतीने या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे,’ असंही ठाकरे म्हणाले असं या पत्रकात म्हटलं आहे. या इंटर्नशिपची संपूर्ण माहिती https://envd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर दिली असून ती माहिती वाचून पात्र उमेदवार या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.
First published:

Tags: Job, State government

पुढील बातम्या