जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / केंद्रीय कृषी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पगार आणि भरती प्रक्रिया

केंद्रीय कृषी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पगार आणि भरती प्रक्रिया

केंद्रीय कृषी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पगार आणि भरती प्रक्रिया

कृषी विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय कृषी विद्यापीठात नोकरीची संधी सध्या उपलब्ध आहे.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 मे- कृषी विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय कृषी विद्यापीठात नोकरीची संधी सध्या उपलब्ध आहे. केंद्रीय कृषी विद्यापीठात रिसर्च असोसिएट (अ‍ॅग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतून एक रिक्त जागा भरली जाणार आहे. या पद भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर उमेदवाराची नियुक्ती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाईल. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनाचा तपशील आणि वयोमर्यादेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. `स्टडी कॅफे डॉट इन`ने याविषयीची माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी विद्यापीठ अर्थात सीएयूमध्ये रिसर्च असोसिएट्स (अ‍ॅग्रीकल्चर/ हॉर्टीकल्चर) या पदाची एक जागा रिक्त असून, त्याकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मे 2023 पर्यंत आहे. या पदावर पात्र उमेदवाराची निवड इंटरव्ह्यू्च्या माध्यमातून होणार आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी विद्यापीठाने अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे. (हे वाचा: इंजिनिअर्स उमेदवारांनो, पुण्यात नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी; महिन्याला लाखो रुपये पगार ) केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या नोटिफिकेशननुसार, रिसर्च असोसिएट (अ‍ॅग्रीकल्चर / हॉर्टीकल्चर) या पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार कृषी विस्तार/कृषी अर्थशास्त्र/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन याविषयात पदव्युत्तर पदवीप्राप्त असावा. तसेच तो नेट/एम.फिल/पीएचडी धारक असावा. इच्छुक उमेदवाराकडे पीआरए प्रशिक्षण आयोजित करण्याचे ज्ञान आणि कौशल्य, क्षेत्र सर्वेक्षण आणि डाटा संकलनाचे कौशल्य असावे. डाटाचे विश्लेषण आणि अहवाल लेखनासाठी कम्प्युटरचे ज्ञान असावे. उमेदवाराला नेपाळी आणि हिंदी भाषा अवगत असावी. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षादरम्यान असावे. रिसर्च असोसिएट या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मे 2023 पर्यंत आहे. या पदावर उमेदवाराची निवड इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाणार असून इंटरव्ह्यूची प्रक्रिया 24 मे 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चर, बर्मीओक-737134, सिक्कीम येथे पार पडेल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    केंद्रीय कृषी विदयापीठाच्या नोटिफिकेशनुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह आवश्यक सेल्फ अ‍ॅटेस्टेड प्रमाणपत्र,पासपोर्ट साइज फोटो आणि अर्ज द डीन, कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चर, बर्मीओक - 737134, सिक्कीम या पत्त्यावर 20 मे 2023 पर्यंत सबमिट करावा. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाची अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात