जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / इंजिनिअर्स उमेदवारांनो, पुण्यात नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी; महिन्याला लाखो रुपये पगार

इंजिनिअर्स उमेदवारांनो, पुण्यात नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी; महिन्याला लाखो रुपये पगार

BEL मध्ये भरती

BEL मध्ये भरती

निवडलेल्या उमेदवारांना 30000 ते 120000 रुपयांदरम्यान मासिक पगार दिला जाईल. वार्षिक सीटीसी 9.48 लाखांपर्यंत असेल. निवड लेखी चाचणी व मुलाखतीच्याआधारे केली जाईल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 11 मे:  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने इंजिनीअर्सकडून अर्ज मागवले आहेत. सहा रिक्त जागा चार वर्षांच्या कालावधीसाठी भरल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. निवडलेल्या उमेदवारांना 30000 ते 120000 रुपयांदरम्यान मासिक पगार दिला जाईल. वार्षिक सीटीसी 9.48 लाखांपर्यंत असेल. निवड लेखी चाचणी व मुलाखतीच्याआधारे केली जाईल. या रिक्त जागांबद्दलची तपशीलवार माहिती जाणून घेऊयात. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. पदांची नावं व रिक्त जागा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ऑप्ट्रॉनिक डिव्हायसेस लिमिटेड (BELOP) चार वर्षांच्या कालावधीसाठी प्रोसेस इंजिनीअर - 1 जागा, प्रोसेस इंजिनीअर (मेटल वर्किंग) - 2 जागा, प्रोग्रॅमर/सेटअप ऑपरेटर - 1 जागा, लॅबोरेटरी इंजिनीअर - 1 जागा व QA इंजिनीअर - 1 जागा या पदांसाठी अर्ज मागवत आहे. ही भरती एव्हिएशन होसेस मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टसाठी केली जात आहे. यात सहा रिक्त जागा भरल्या जातील.

News18लोकमत
News18लोकमत

वयोमर्यादा या पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) - 3 वर्षांची शिथिलता दिली जाईल. अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील किमान 40% अपंगत्व असलेल्या उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल. पात्रता - अर्जदारांनी BE/B.TECH (मेकॅनिकल) केलेलं असणं आवश्यक आहे. - प्रोसेस इंजिनीअर पदासाठी उमेदवाराला किमान 2-3 वर्षांचा संबंधित औद्योगिक कामाचा अनुभव असावा. -इच्छुकांना उर्वरित पदासाठी मॅन्युफॅक्चरिंग व मेटलवर्किंगमध्ये 2-3 वर्षांचा अनुभव असावा. रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी ‘या’ मंत्रालयात नोकरीची मोठी संधी; कसा कराल अप्लाय; इथे मिळेल लिंक पगार निवडलेल्या उमेदवारांना 30000 ते 120000 रुपयांदरम्यान मासिक पगार दिला जाईल. वार्षिक सीटीसी 9.48 लाखांपर्यंत असेल. SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय निवड प्रक्रिया शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणी व मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. अर्ज करण्यासाठी पत्ता Dy. Manager – HR, BEL Optronic Devices Limited, EL-30, ’J’ Block, Bhosari Industrial Area, Pune- 411026. IPS Success Story: 15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS अर्ज कसा करायचा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेला अर्जाचा फॉरमॅट डाउनलोड करून तो योग्यरित्या भरावा. सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेटसह तो पोस्ट/कुरिअरद्वारे पाठवावा. त्या लिफाफ्यावर अर्ज केलेल्या पोस्टचे नाव लिहून तो शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात