मुंबई, 16 एप्रिल: CBSE बोर्डाची टर्म दोनची परीक्षा (CBSE Board Exam 2022) ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही (Hall Ticket CBSE term 2 exam) देण्यात आले आहेत. ही परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र कोरोना संपूर्णपणे नाहीसा झाला असं वाटत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये पुन्हा कोरोनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता पालकांनी बोर्डाच्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे. JEE Exam Tips: परीक्षेला काही दिवस शिल्लक; Crack करण्यासाठी असा करा अभ्यास
पालकांची चिंता वाढली
कोविड-19 सुरक्षेशी संबंधित सर्व प्रोटोकॉल त्यांच्या मुलीच्या शाळेत पाळले जात आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये ज्याप्रकारे कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळेत परीक्षादेतील त्या शाळेत प्रोटोकॉल पाळला जाईल की नाही, अशी भीती वाटत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा होम सेंटरमध्ये व्हावी असं काही पालकांचं म्हणणं आहे. काय आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं परीक्षा होम सेंटरवर व्हाव्यात अशी विद्यार्थ्यांचीही इच्छा आहे कारण विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्राधान्य हे सुरक्षित असण्याला आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेसारखी स्वच्छता व्यवस्था इतर शाळांमध्ये असू शकत नाही, त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा शाळेच्या होम सेंटरवरच घेतल्या पाहिजेत असं काही विद्यार्थ्यांचं मत आहे. CBSE Exam Tips: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला घाबरू नका; Planning नुसार करा Study लसीच्या दोन्ही डोसनंतरही चिंता एक पालक म्हणतात, बोर्डाच्या परीक्षा घरच्या केंद्रांवर घेतल्या पाहिजेत जसे पूर्व-बोर्ड परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. त्यांच्या मुलाला लसीचे दोन्ही डोस मिळाले असले तरी, त्यांना भीती आहे की जर त्यांच्या मुलाला कोविड-19 ची लागण झाली तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही याची लागण होऊ शकते. म्हणूनच परीक्षा या विद्यार्थ्यांच्या होम सेंटरवरच घेण्यात याव्या असं पालकांचं मत आहे.