Home /News /career /

CBSE Result: निकालासंदर्भातील 'त्या' Fake परिपत्रकामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप; जाणून घ्या काय आहे प्रकरण

CBSE Result: निकालासंदर्भातील 'त्या' Fake परिपत्रकामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप; जाणून घ्या काय आहे प्रकरण

याबाबतीत CBSE कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

याबाबतीत CBSE कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

हे परिपत्रक (Fake circular regarding CBSE term 1 exam Result) CBSE च्या नावावर असून यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.

    मुंबई, 25 जानेवारी: कोरोनाकाळात मागील वर्षी CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE board Exam 2022) रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र यंदा खबरदारीचा उपाय म्हणून CBSE च्या परीक्षा या दोन सत्रांमध्ये (CBSE Term exams) घेतल्या जाणार आहेत. यातील पहिल्या सत्राची म्हणजेच टर्म 1 (CBSE Term 1 Exams) ची परीक्षा गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल (CBSE term 1 exam Result) हा याच आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र या आधी एक परिपत्रक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलं आहे. हे परिपत्रक (Fake circular regarding CBSE term 1 exam Result) CBSE च्या नावावर असून यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. या परिपत्रकावर CBSE ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसंच CBSE चा निकाल विद्यार्थ्यांना बघायचा असेल तर विद्यार्थ्यांना दिलेल्या सेंटर्सवर जाऊन आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे असं सांगण्यात आलं आहे. जर विद्यार्थी हा आयडी आणि पासवर्ड घेतील तरच त्यांना CBSE चा निकाल बघता येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. CBSE च्या नवीन पोर्टलवर हा निकाल बघण्यात येणार आहे आणि म्हणूनच CBSE ची नवीन पॉलिसी आहे असंही या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. तुम्हीही नोकरी सोडण्याचा विचार करताय? मग अशा पद्धतीनं लिहा Resignation Letter दरम्यान याबाबतीत CBSE कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. CBSE च्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघण्यासाठी कुठंही जाण्याची आणि कोणालाही भेटण्याची गरज नाही असं CBSE कडून सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा CBSE च्या ऑफिशिअल वेबसाईटवरच बघता येणार आहे. यासाठी कोणताही आयडी आणि पासवर्ड लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या टर्म 1 परीक्षाच नंबर एंटर करून च निकाल बघता येणार आहे असंही CBSE कडून सांगण्यात आलं आहे. अजूनही CBSE टर्म 1 परीक्षेच्या निकालाची तारीख (CBSE term 1 exam Result date) जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट बघत आहेत. मात्र अशा चुकीच्या आणि खोट्या परिपत्रकांमुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यंदा परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असल्यामुळे टर्म 1आणि टर्म 2 या दोन्ही परीक्षांचे निकाल मिळून अंतिम निकाल ठरवला जाणार आहे. दरम्यान अशा प्रकारच्या कोणत्याही परिपत्रकांवर विश्वास ठेऊ नये आणि कोणत्याही वेबसाईटवर स्वतःची माहिती देऊ नये असं आवाहन CBSE तर्फे करण्यात आलं आहे. यासंदर्भातील ट्विटही CBSE तर्फे करण्यात आलं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, CBSE, Fake

    पुढील बातम्या