मुंबई, 26 जून: काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म दोन परीक्षा पार पडली होती. म्हणूनच आता विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. याच CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सम्पवर येतेय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या महिन्यात आणि जुलै महिन्यात इयत्ता 10वी टर्म 2 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते, तर 12वीचा निकाल 2022 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. CBSE सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार इयत्ता 10वीचा निकाल जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, पुढच्या महिन्यात 12वीचा निकाल 2022 ला अपेक्षित आहे. जॉब शोधण्यासाठी ना सुरत जावं लागेल ना गुवाहाटी; घरबसल्या मिळेल जॉब; कसा ते वाचा असं होईल मूल्यांकन CBSE बोर्डाकडून टर्म 1 च्या परीक्षेच्या निकालानंतर, यावेळी निकाल एकत्रित केला जाणार आहे, म्हणजे टर्म 1 आणि टर्म 2 च्या दोन्ही परीक्षांचे निकाल त्यात समाविष्ट केले जातील. CBSE बोर्ड टर्म 2 चा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थी अंतिम निकालातून टर्म 1 परीक्षेचा निकाल वजा करू शकतात. कंपनीचा नोटीस पिरेड म्हणजे सर्वात कठीण काळ; पण ‘या’ गोष्टी कराल तर येईल मजा असा चेक करा निकाल CBSE बोर्डाचा 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सापडतील. आता तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून आवश्यक तपशील सबमिट करावा लागेल. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.