मुंबई, 08 नोव्हेंबर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत इयत्ता 10वी आणि 12वीची डेटशीट जारी करू शकते. पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आवश्यक माहिती जारी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच परीक्षांच्या तारखा जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागण्याची वेळ आहे. यावर्षी सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी परीक्षेसाठी आणि 16 लाख विद्यार्थ्यांनी 12वी साठी नोंदणी केली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकाच वेळी सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. राज्याच्या वस्त्र मंत्रालयात महिन्याला 2 लाख रुपये पगाराची नोकरी; तुम्ही आहात का पात्र? लगेच करा अप्लाय CBSE बोर्डाची परीक्षा कधी होणार? विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा मार्चअखेर संपणार आहे, तर बारावीची परीक्षा एप्रिलच्या मध्यापर्यंत चालणार आहे. CBSE बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 1 जानेवारी 2023 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. 10वी पास असो वा ग्रॅज्यूएट्स DRDO मध्ये 1061 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या Link CBSE बोर्ड परीक्षा 2023 ची डेटशीट कशी डाउनलोड करावी? CBSE बोर्ड परीक्षा 2023 चे डेटशीट प्रसिद्ध झाल्यानंतर, एखाद्याला cbse.gov.in वर जावे लागेल. तेथे तुम्हाला ‘शैक्षणिक वेबसाइट’ वर क्लिक करावे लागेल. त्यावर दिसणार्या ‘CBSE 10, 12 Datesheet 2023 Download’ या लिंकवर क्लिक करा. डेटशीटचे पीडीएफ पेज नवीन विंडोवर उघडेल. ते तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.