जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CBSE Exam 2021 : दहवी आणि बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार

CBSE Exam 2021 : दहवी आणि बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार

CBSE Exam 2021 : दहवी आणि बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार

नवीन परीक्षा पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांनी घोका आणि गुण मिळवा या ऐवजी विषय समजून घेऊन परीक्षा द्या यावर भर दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद (CBSE) बोर्डानं परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठी घोषणा केली आहे. इयत्ता दहवी आणि बारावीच्या पेपरचा पॅटर्न बदलण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021 पासून तो लागू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये विद्यार्थ्यांना आता केवळ घोकंपट्टी करून मार्क मिळवता येणार नाहीत तर त्यासाठी आवांतर वाचन आणि अभ्यासही करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी 80 मार्कांच्या पेपरमध्ये 27 गुण तर 70 गुणांच्या पेपरमध्ये 23 तर 30 गुणांच्या पेपरसाठी 10 गुण मिळणं अत्यावश्यक आहे. हिंदुस्तान समाचारने दिलेल्या वृत्तानुसार या बदलांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे लखनऊ पब्लिक स्कूलच्या संचालिका रश्मी पाठक यांनी सांगितले. त्याच वेळी लखनऊ पब्लिक कॉलेजिएटचे जावेद आलम खान म्हणाले की मॉडेल पेपरदेखील त्याच आधारे तयार केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी घोका आणि गुण मिळवा या ऐवजी विषय समजून घेऊन परीक्षा द्या यावर भर दिला आहे. हे वाचा- JEE Main 2021: परीक्षापद्धतीत ‘हे’ बदल करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत परीक्षेत सामाजिक विज्ञान पेपरमधीलल एकाधिक निवड प्रश्नांची संख्या 20 वरून 16 करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विज्ञान विषयामध्ये 32 ऐवजी 36 प्रश्न विचारले जातील. गणिताच्या पेपरमध्ये केस स्टडीचे चार प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या 20 वरून 16 करण्यात आली आहे. अशा पद्धतीच्या अभ्यासक्रम आणि पेपर पद्धतीमुळे विद्यार्थी केवळ विषयाची घोकंपट्टी करून मार्क मिळवणार नाहीत तर विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी केस स्टडीवर आधारीत प्रश्न विचारल्यानं विद्यार्थ्यांना आवांतर वाचन आणि चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता वाढीस लागेल त्याचा फायदा होईल असंही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात