नवी दिल्ली, 15 जुलै: CBSE बोर्डानं दहावी आणि बारावी (CBSE Board 12th result Date) या दोन्ही परीक्षा कोरोनामुळे रद्द केल्या होत्या. आता विद्यार्थ्यांना CBSE बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. यावर आता CBSE बोर्डानं (CBSE Board) निगडित शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून काही आदेश दिले आहेत. सीबीएसई बोर्डानं सर्व शाळांना निर्धारित कालावधीत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरुन 31 जुलैपूर्वी हा निकाल अधिकृतपणे जाहीर करता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) माहिती दिली होती की शाळा या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करणार नाही कारण शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण सादर केले नाहीत. निकाल या आठवड्यात येणार नाही. ज्या शाळांनी अद्याप बोर्डाकडे गुण जमा केले नाहीत अशा शाळांसाठी आम्ही आज एक परिपत्रक देखील जारी करू. आम्ही अशा शाळांना नोटीसमध्ये सूचना देऊ असं CBSE च्या परीक्षा नियंत्रकांनी म्हंटलं आहे. हे वाचा - Big Breaking News: उद्या लागणार दहावीचा निकाल, असा चेक करा निकाल या तारखेपर्यंत जाहीर होणार निकाल CBSE नं सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सर्व डेटा अपडेट करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता सर्व डेटा अपलोड झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. असं होणार मूल्यांकन CBSE बारावीचा निकाल- दहावी, अकरावी आणि बारावीच्या निकालांच्या आधारे मूल्यांकन होणार आहे. अनुक्रमे 30:30:40 च्या फॉर्म्युलावरकेलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







