नवी दिल्ली, 03 डिसेंबर : कोरोनामुळे अद्यापही काही शाळा बंद आहेत. तर काही शाळा 9वी ते 12वी पर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. अंतिम परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत अद्यापही संभ्रम आहे. कोरोनाचा वाढणारा संसर्ग आणि एकूण परिस्थिती पाहता परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाइन याबाबत अद्यापही ठोस निर्णय समोर आला नसताना आता CBSE बोर्डानं आपली भूमिका जाहीर करत मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार 2021च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील असं सांगण्यात आलं आहे.
Dear all, 2020 has been a year of a great many changes like adjusting to #onlineeducation, adapting to #newnormal.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 2, 2020
Happy to share that I am going live on Dec 10 to talk about upcoming competitive/board exams with you.
Drop your concerns below using #EducationMinisterGoesLive. pic.twitter.com/E9bigQQRaL
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी काही समस्या निर्माण झाल्या तर त्यावर वेगळा मार्ग शोधण्यात येतील पण बोर्डाची परीक्षा ही ऑनलाइन नाही तर लेखीच घेण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना कोव्हिडचे प्रोटोकॉलही पाळण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना वर्गात प्रायोगिक कामासाठी हजर राहता आले नाही तर पर्यायांचा शोध घेण्यात येईल असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हे वाचा- पती आणि कुटुंबीयांच्या साथीनं चौथ्यांदा डॉक्टर अश्वती झाल्या IAS केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ येत्या वर्षाच्या बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या मुद्यावर 10 डिसेंबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा करणार आहेत. साधारण बोर्डाच्या परीक्षा मे पर्यंत होणं अपेक्षित असतं मात्र यंदा आलेलं हे कोरोनाचं संकट आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू पुन्हा शाळा पूर्वपदावर येत आहेत. तर परीक्षांच्या तारखांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे.