• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • CBSE 10th Result 2021: थोड्याच वेळात जाहीर होणार CBSE 10वीचा निकाल; असा चेक करा निकाल

CBSE 10th Result 2021: थोड्याच वेळात जाहीर होणार CBSE 10वीचा निकाल; असा चेक करा निकाल

आज म्हणजेच 03 ऑगस्टला दुपारी बारा वाजता जाहीर केला जाणार आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE नं नुकताच बारावीचा निकाल (CBSE 10th Result 2021) जाहीर केला आहे. आता दहावीचे विद्यार्थीही त्यांच्या निकालाची वाट पाहत होते. CBSE बोर्ड 10 वीचा निकाल (CBSE 10th Result date and time) या आठवड्यात जाहीर करेल असा दावा विविध माध्यमांच्या अहवालांमध्ये केला जात होता. त्यानुसार आता CBSE चा निकाल आज म्हणजेच 03 ऑगस्टला दुपारी बारा वाजता जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून रोल नंबर जारी करण्यात आले आहेत. इयत्ता 12 वी प्रमाणे, 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल तपासण्यासाठी त्यांचे रोल नंबर ऑनलाईन डाउनलोड करावे लागतील. Maharashtra HSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा? असा चेक करा रोल नंबर दहावीचा निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर 'रोल नंबर फाइंडर 2021' (Roll Number Finder 2021) या लिंकवर क्लिक करा. यानंतर सर्व्हर निवडा नेक्स्ट पेजवर 'Continue' वर क्लिक करा आता, 'वर्ग 10' निवडा विचारलेले सर्व तपशील एंटर करा. यानंतर तुमचा CBSE 10वीचा रोल नंबर जाणून घेण्यासाठी 'Search Data' वर क्लिक करा. असा चेक करा निकाल सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा. 10 वीचा निकाल 2021 मुख्यपृष्ठावर लिंक करा. आता रोल नंबर वगैरे टाकून इथे सबमिट करा. परिणाम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता डाउनलोड कर. आजच जाहीर होणार स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल या वर्षीच्या कोरोनासाथीमुळे ऐतिहासिक ठरलेल्या शैक्षणिक वर्षातला बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra Board class 12th result date) 3 ऑगस्ट म्हणजे मंगळवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (msbshse.co.in) निकाल (HSC Result) पाहायला मिळेल. त्याबरोबरच News18lokmat च्या वेबसाइटवही अधिकृतपणे हा निकाल तुम्ही पाहू शकाल. आज दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published: