Home /News /career /

बारावीची Term 2 परीक्षा कधी? CBSE बोर्डाने जाहीर केली Data sheet

बारावीची Term 2 परीक्षा कधी? CBSE बोर्डाने जाहीर केली Data sheet

सीबीएससीच्या बारावीची दुसऱ्या टर्मची परीक्षा सब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे आणि ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. हॉल तिकिट कधी मिळणार, कधी सुरू होणार पेपर पाहा सविस्तर टाइमटेबल

    दिल्ली, 11 मार्च: CBSE बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बारावी Term 2 परीक्षेचं वेळापत्रक(CBSE Date Sheet 2022)त्यांच्या ऑफिशिअल वेबसाइटवर जाहीर केलं आहे. cbse.gov.in किंवा cbse.nic.in या वेबसाइटवर याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. सीबीएससीच्या बारावीची दुसऱ्या टर्मची परीक्षा सब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे. कोरोना काळामुळे मागच्या काही परीक्षा ऑनलाइन झालेल्या असल्या तरी ही परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. 26 एप्रिल 2022 पासून परीक्षेला सुरुवात होईल. Board Exam Tips: परीक्षांच्या काळात नक्की किती वेळ करावा अभ्यास? वाचा सविस्तर CBSE datesheet pdf फॉरमॅटमध्ये डाउनलोड करण्याचा पर्यायही मंडळाने त्यांच्या साइटवर उपलब्ध करून दिला आहे. 26 एप्रिलला सुरू झालेली ही परीक्षा 15 जूनपर्यंत चालणार आहे.सीबीएसई बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर लवकरच जारी करेल, असं मंडळाने कळवलं आहे. हॉल तिकिट, परीक्षा केंद्र याची माहिती महाविद्यालयांत किंवा ऑनलाइनही कळू शकेल. त्यासाठी CBSE ची ऑफिशिअल वेबसाइट पाहावी लागेल. राज्यात नुकतीच बारावीची महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा (Maharashtra state 12th Board Exams 2022) सुरु झाली आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये दहावी बोर्डाची परीक्षाही (Maharashtra state 10th board Exam 2022) सुरु होणार आहे. आता CBSE च्या परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर झालं आहे.
    First published:

    Tags: Board Exam, CBSE

    पुढील बातम्या