Home /News /career /

Career Tips: MBA करण्यासाठी असणारी CAT परीक्षा म्हणजे नक्की काय? कसं असतं Exam Pattern? जाणून घ्या

Career Tips: MBA करण्यासाठी असणारी CAT परीक्षा म्हणजे नक्की काय? कसं असतं Exam Pattern? जाणून घ्या

CAT परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती

CAT परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला CAT परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 23 जानेवारी: व्यवसाय किंवा मॅनेजमेंटमध्ये (Education in management) आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर MBA (How to do MBA after graduation) करण्याची प्रचंड इच्छा असते. पदवीनंतर MBA करून अनेक विद्यार्थी चांगला जॉब (Jobs after MBA) मिळवतात. मात्र चांगला जॉब मिळवण्यासाठी चांगल्या MBA कॉलजेमधून (Best MBA College in Maharashtra) शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं. अनेकदा चांग कॉलेज न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगला जॉब लागू शकत नाही. पण मग चांगलं कॉलेज मिळणार कसं?. MBA चांगल्या कॉलजेमधून करायचं असेल तर CAT ही प्रवेश परीक्षा (What is CAT Exam?) देणं महत्त्वाचं असतं. मात्र ही परीक्षा कशी असते? परीक्षेचं Exam Pattern कसं असतं? (exam Pattern for CAT) हे अनेकांना माहिती नसतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला CAT परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. CAT म्हणजे नक्की काय?  कोणत्याही IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेला CAT म्हणतात. CAT चा पूर्ण फॉर्म कॉमन अॅडमिशन टेस्ट आहे, ही प्रवेश परीक्षा आयआयएमद्वारे घेतली जाते. जर तुम्ही CAT च्या निवड प्रक्रियेत यशस्वी झालात, तर तुम्हाला कोणत्याही IIM मध्ये MBA साठी प्रवेश मिळतो, तसेच CAT स्कोअरच्या आधारे तुम्ही इतर व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश घेऊ शकता. 10th Passed Jobs: उमेदवारांनो, ही संधी सोडू नका; Mahatransco चंद्रपूर इथे भरती CAT साठीची पात्रता (Eligibility for CAT Exam) जर तुम्हाला CAT द्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. (ST SC आणि PDW साठी पदवीमध्ये किमान 45% गुण अनिवार्य आहे) ही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा नाही. पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमधील विद्यार्थी देखील CAT साठी अर्ज करू शकतात परंतु जर त्यांनी अनिवार्य (50% किंवा 45%) पदवी पूर्ण केली नाही तर CAT परीक्षेसाठी त्यांचा अर्ज वैध राहणार नाही. असा असतो Exam Pattern (exam Pattern for CAT) साधारणपणे, CAT परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू होते आणि CAT परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाते. CAT ही संगणकावर आधारित प्रवेश परीक्षा आहे, साधारणपणे 100 प्रश्न विचारले जातात, परंतु सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन त्यात 2020 पासून काही बदल करण्यात आले आहेत ज्यामध्ये एकूण 76 MCQआणि NON MCQ प्रश्न विचारण्यात आले आहेत. प्रश्न. जे सध्या चालू राहण्याची अपेक्षा कमी आहे, अशा स्थितीत पूर्वीचा पॅटर्न म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि 3 तासांचे स्वरूप परत येऊ शकते. CAT परीक्षेचा पेपर 3 विभागात विभागलेला आहे, प्रत्येक विभागासाठी 40 मिनिटे, तुम्हाला ते सोडवण्यासाठी एकूण 2 तास मिळतील. पण जर 100 प्रश्नांचे स्वरूप परत आले तर त्यासाठी तुम्हाला 3 तास ​​मिळतील.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Cat, Entrance exam

    पुढील बातम्या