मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: तुम्हालाही Cars ची प्रचंड आवड आहे? मग डिझाईन करणंही शिका; असं करा करिअर

Career Tips: तुम्हालाही Cars ची प्रचंड आवड आहे? मग डिझाईन करणंही शिका; असं करा करिअर

Car डिझाईन करणंही शिका

Car डिझाईन करणंही शिका

आजकाल तरुणांमध्ये कारच्या डिझाईनबद्दल आणि गाड्यांच्या फीचर्सबद्दल खूप क्रेझ आहे. ज्याप्रकारे वाहनांच्या डिझाइनमध्ये प्रयोग केले जात आहेत, त्यावरून ऑटोमोबाईल डिझायनिंगमध्ये तरुणांसाठी उज्ज्वल भविष्य आहे,

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर:  क्रिएटिव्ह आणि गाड्यांची आवड असलेले तरुण ऑटोमोबाईल डिझायनिंग किंवा कार डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर घडवू शकतात. या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी उमेदवाराने क्रिएटिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या काळात तरुणांमध्ये या फील्डमध्ये करिअर करण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. आजकाल तरुणांमध्ये कारच्या डिझाईनबद्दल आणि गाड्यांच्या फीचर्सबद्दल खूप क्रेझ आहे. ज्याप्रकारे वाहनांच्या डिझाइनमध्ये प्रयोग केले जात आहेत, त्यावरून ऑटोमोबाईल डिझायनिंगमध्ये तरुणांसाठी उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हणता येईल. या फील्डशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

कोण होऊ शकतं कार डिझायनर?

1. कार डिझायनर होण्यासाठी उमेदवाराला 12वीमध्ये गणित विषयासह चांगले गुण असणं आवश्यक आहे.

2. उमेदवाराने 12वी नंतर ट्रान्स्पिरेशन डिझाइन किंवा इंडस्ट्रियल डिझाइनमध्ये डिग्री पूर्ण केलेली असावी.

3. चांगली स्किल्स डेव्हलप करण्यासाठी उमेदवार 3D ड्रॉइंग क्लासेस करू शकतात.

4. ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केल्यानंतर, उमेदवार इंडस्ट्रियल डिझाइनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेऊ शकतात.

ग्रॅज्युएट आहात ना? मग कोणतीच परीक्षा न देताही मिळेल नोकरी; इथे मिळतील जॉब्स

कोर्स नंतर नोकरी कुठे मिळेल?

ऑटोमोटिव्ह डिझाइनमध्ये इंटरेस्ट असलेल्या उमेदवारांसाठी या फील्डमध्ये अनेक पर्याय आहेत. कोर्स केल्यानंतर तरुणांना आर्किटेक्ट, प्रॉडक्ट डिझायनर, ड्राफ्टर्स, ऑटोमोटिव्ह इंजिनीअर, ग्राफिक डिझायनर फर्म, ऑटोमोबाईल कंपन्या, आयटी फर्म, आर्किटेक्चरल फर्म आणि प्रॉडक्शन फर्ममध्ये नोकरीची संधी उपलब्ध असेल.

पगार किती असेल?

या फील्डमध्ये किमान एक किंवा दोन वर्षं काम केल्यानंतरच कोणत्याही उमेदवाराचा पगार 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो. दुसरीकडे, कार डिझायनर्सना सुरुवातीला किमान 2,54,000 रुपये प्रति वर्ष पगाराची नोकरी मिळू शकते. पुढे अनुभवानुसार त्यांचा पगार वर्षाकाठी 10 ते 20 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो.

कोर्स कुठे करता येतील?

नॅशनल इन्स्टिट्युट फॉर फॅशन डिझाईन, मुंबई

नॅशनल इन्स्टिट्युट फॉर फॅशन डिझाईन, नवी दिल्ली

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन, बेंगळुरू

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन, अहमदाबाद

स्पर्धेच्या या युगात अनेक जण सरकारी नोकरीच्या मागे धावतात, काहींना खासगी क्षेत्रांत नोकरी करायची असते; पण कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे माहीत नसल्याने त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या क्षेत्रात करिअर करायचा विचार करत असाल, तर त्या कोर्सला किती मागणी आहे, त्याच्याशी संबंधित किती कंपन्या आहेत आणि नोकरीची संधी किती आहे, याचा विचार करायला हवा. कारण तुम्ही मागणी असलेला कोर्स केल्यास तुम्हाला लवकर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

First published:

Tags: 300 cars, Career, Career opportunities, Job