मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: लाखोंमध्ये सॅलरी पॅकेज आणि सरकारी नोकरीचीही मिळेल संधी; Ethical Hackingमध्ये करा करिअर

Career Tips: लाखोंमध्ये सॅलरी पॅकेज आणि सरकारी नोकरीचीही मिळेल संधी; Ethical Hackingमध्ये करा करिअर

Ethical Hackingमध्ये करा करिअर

Ethical Hackingमध्ये करा करिअर

आज आम्ही तुम्हाला एथिकल हॅकिंग क्षेत्रात करिअर कसं करणार आणि कसं शिक्षण घेणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 23 सप्टेंबर: सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटला प्रचंड मागणी वाढली आहे. प्रत्येकजण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहे. मात्र यामुळे या क्षेत्रातील गुन्हेही वाढू लागले आहेत. काही गुन्हेगारी मानसिकतेचे लोकं सायबर क्राईम करून अनेकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे सायबर सिक्युरिटी महत्त्वाची झाली आहे. म्हणूनच सायबर क्षेत्रात करिअर करण्याच्या संधीही वाढल्या आहेत. Ethical Hacking याचाच एक भाग आहे. एथिकल हॅकिंगमध्ये हे करिअरच्या संधी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एथिकल हॅकिंग क्षेत्रात करिअर कसं करणार आणि कसं शिक्षण घेणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. कोण असतात Ethical Hackers? Ethical Hackers हे कोणतीही सिस्टीम हाक करतात मात्र हे काम ते इंटरनेट प्रणालीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी करतात. एथिकल हॅकरचे मुख्य काम म्हणजे कंपनीच्या संगणक प्रणालीची सुरक्षा तपासणे, जेणेकरून ते कंपनीचा डेटा हॅक किंवा चोरी होण्यापासून वाचवू शकेल. तसेच, ते संगणक प्रणालीतील त्रुटी शोधतात, ज्यामुळे इतर हॅकर्स सायबर गुन्हे करतात. याशिवाय कोणताही सायबर गुन्हा घडला तरी सायबर गुन्हेगाराला पकडण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. म्हणूनच त्यांना सुरक्षा विश्लेषक, पेनिट्रेशन टेस्टर्स किंवा व्हाईट हॅकर्स म्हणूनही ओळखले जाते. हे एक आव्हानात्मक काम आहे, त्यामुळे आवश्यकतेनुसार चोवीस तास काम करणे अपेक्षित आहे. 2,00,000 लाख रुपये प्रतिमहिना पगाराची नोकरी; BMCमध्ये अर्जाची आज शेवटची तारीख
हे स्किस्ल असणं आवश्यक
करिअर करण्यासाठी संगणक आणि इंटरनेटचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रत्येक अपडेटची माहिती असावी लागेल. याशिवाय तांत्रिक ज्ञानाबरोबरच तुमची विचार करण्याची पद्धतही जबरदस्त असावी. ज्याप्रमाणे चोराला पकडण्यासाठी चोरासारखा विचार करावा लागतो, तसाच सायबरच्या जगात एथिकल हॅकरने गुन्हेगारासारखा विचार करायला हवा. तरच तो नव्या युगात होत असलेले सायबर गुन्हे समजून घेऊन त्याला आळा घालू शकेल. करिअरसाठी ही शैक्षणिक पात्रता आवश्यक तुम्हालाही यामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही पदवीनंतर इथिकल हॅकिंग कोर्स करू शकता. तसे, काही ठिकाणी हा अभ्यासक्रम बारावीनंतरही घेतला जातो. या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला संगणक प्रोग्रामिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, तुम्हाला प्रोग्रामिंग भाषा आणि विंडोज किंवा लिनक्स सारख्या संगणकात वापरल्या जाणार्‍या ऑपरेटिंग सिस्टमचे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हालाही महिन्याला लाखो रुपये पगाराची नोकरी हवीये? मग यामध्ये करा Graduation
करिअरच्या संधी
आजच्या काळात एथिकल हॅकर्ससाठी कामाची कमतरता नाही आणि आगामी काळात त्यांची मागणी वाढतच जाईल. कोर्स केल्यानंतर तुम्ही लष्कर, पोलिस, गुप्तचर विभाग, फॉरेन्सिक विभाग आणि इतर सरकारी विभागांमध्ये सेवा करू शकता.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Mumbai

पुढील बातम्या