जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तुम्हालाही महिन्याला लाखो रुपये पगाराची नोकरी हवीये? मग 'या' विषयात करा ग्रॅज्युएशन

तुम्हालाही महिन्याला लाखो रुपये पगाराची नोकरी हवीये? मग 'या' विषयात करा ग्रॅज्युएशन

तुम्हालाही महिन्याला लाखो रुपये पगाराची नोकरी हवीये? मग 'या' विषयात करा ग्रॅज्युएशन

तुम्हाला अर्थशास्त्र विषयात रस असेल तर बारावीनंतर तुम्ही बीए इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये (BA Development In Economics) डिग्री घेऊ शकता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई,  22 सप्टेंबर:  काही मुलांना शालेय जीवनापासूनच अर्थशास्त्र विषय खूप आवडत असतो. अर्थशास्त्र हा एक असा विषय आहे ज्यामध्ये मानवी जीवनातील दैनंदिन घटकांशी संबंधित अनेक प्रकारांचा अभ्यास केला जातो. तुम्हाला अर्थशास्त्र विषयात रस असेल तर बारावीनंतर तुम्ही बीए इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये (BA Development In Economics) डिग्री घेऊ शकता.

    बीए डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स हा 3 वर्षांचा पदवीपूर्व म्हणजेच अंडरग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहे. हा कोर्स 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला असून, या कोर्सअंतर्गत वर्षभरात 2 सेमिस्टर शिकवली जातात. प्रत्येक सेमिस्टर पूर्ण झाल्यानंतर सेमिस्टर परीक्षा घेतली जाते. या कोर्समध्ये विद्यार्थी 12वी (Career Options After 12th) नंतर प्रवेश घेऊ शकतात.

    अॅडमिशन प्रोसेस

    बीए डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स कोर्सला अॅडमिशन फक्त प्रवेश परीक्षेद्वारे घेता येते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. बीए डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स कोर्सची फी 3 हजार रुपयांपासून सुरू होऊन 2 लाखांपर्यंत असू शकते.

    बीए डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्ससाठी पात्रतेच्या अटी

    डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये बीए करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काही आवश्यक पात्रता असणं अनिवार्य आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकाल.

    1. कमीत कमी 12वी उत्तीर्ण असायला हवं.

    2. या कोर्समध्ये अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये किमान 55 टक्के गुण असणं आवश्यक आहे.

    3. या कोर्समध्ये फक्त एंट्रन्स एक्झाम देऊन अॅडमिशन मिळेल.

    4. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.

    10वी, 12वी उत्तीर्णांनो, घाई करा! 29,000 रुपये पगाराची नोकरी सोडू नका; उद्या शेवटची तारीख

    डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समधील जॉब प्रोफाइल आणि पगार

    1. टीम लीडर म्हणून काम करणारे वर्षाकाठी जवळपास 7 लाख रुपये कमवू शकतात.

    2. मॅनेजिंग एडिटरच्या पोस्टवर काम करणारे वर्षभरात जवळपास 7.50 लाख रुपये कमवू शकतात.

    3. इकॉनॉमिक्सचे शिक्षक म्हणून काम करून वर्षभरात जवळपास 2 लाख रुपये कमवता येतात.

    4. कंटेंट डेव्हलपर म्हणून काम करून वर्षभरात 2.43 लाख रुपये कमवता येतात.

    5. डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून वर्षभरात जवळपास 1.50 लाख रुपये कमवता येतात.

    10वी पास असो वा ग्रॅज्युएट महिन्याचा 83,000 रुपये पगार; मुंबईत 1041 Vacancy

    डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स कोर्सला असा आहे स्कोप

    हा कोर्स केल्यानंतर तुमच्याजवळ अनेक करिअर ऑप्शन उपलब्ध असतील. याशिवाय विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकतात.

    1. एमए इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स

    2. एम फिल इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स

    3. पीएचडी इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स

    4. एमबीए

    अशा रितीने बीए डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स केल्यानंतर करिअरच्या संधी उपलब्ध असतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात