Home /News /career /

Career Tips: करिअरमध्ये स्थैर्यासोबतच यशही मिळवायचं? मग 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की ठेवा लक्षात

Career Tips: करिअरमध्ये स्थैर्यासोबतच यशही मिळवायचं? मग 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की ठेवा लक्षात

यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत

यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत

जाणून घेऊया करिअरमध्ये स्थैर्य (Stability in career) आणि यश मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या 3 गोष्टी आवश्यक आहेत.

    मुंबई, 03 जानेवारी: सध्याच्या काळात उत्तम करिअर (Career Tips) हे कोणाला नको असतं. सर्वांनाच करिअरमध्ये स्थैर्य (How to Stable in career) आणि यश (Success tips) हे एकाचवेळी हवं असतं. मात्र सदयःस्थिती बघता हे जरा कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. जर तुम्ही प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तर या गोष्टी फारशा अवघड नाहीत. परंतु, एखाद्या वेळी नकळत आपल्या हातून काहीतरी चूक होते आणि हिच चूक आपल्याला महागात पडते. यशाच्या जवळ पोहचत असताना ते यश आपल्या हातातून निसटतं. त्यामुळे अशा 3 गोष्टी आहेत की ज्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जाणून घेऊया करिअरमध्ये स्थैर्य (Stability in career) आणि यश मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. करू नका चुका   सध्याच्या काळात कोणाताही जॉब (Latest jobs) किंवा कोणत्याही क्षेत्रात (Career) काही व्यक्ती असतात की त्या तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी उत्तेजित करतात किंवा वरिष्ठांना तुमच्या विरोधात सांगून भडकून देतात. परंतु, अशा लोकांकडे लक्ष न देता, शक्य होईल तितके त्यांच्यापासून दूर राहावे. अशा लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्या हातून काही चूक (Mistake in career) होणार नाही ना किंवा तुम्ही चुकीची प्रतिक्रिया देत नाहीत याकडे लक्ष दया. कारण तुम्ही यापैकी काही केलं तर तुम्ही नक्की अडचणीत याल. त्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातून अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनो, आता 'या' हटके ब्रांचेसमध्ये करा Engineering; मिळेल भरघोस पगार काम करत असलेल्या क्षेत्राविषयीची आवड महत्त्वाची तुम्ही कोणतंही क्षेत्र करिअरसाठी (Perfect Career) निवडा, मग ते सरकारी (Government jobs)असो किंवा खाजगी (Private sector jobs), प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या संधी नक्कीच उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील संधीमध्ये रुची (Interest) कायम ठेवणे आवश्यक असते. अनेकदा प्रगती करण्यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य (Skills) अधिक वाढवावे लागते, त्यासाठी नव्या परीक्षा देण्याची तयारी देखील ठेवा. जर तुम्हाला तुमचे फिल्ड मनापासून आवडत असेल अशा परीक्षा देताना चिंता किंवा भिती बाळगण्याचे कारण नाही. अशा आव्हानांचा तुम्ही यशस्वीपणे सामना करा. आपल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ व्हा जर तुम्ही तुमच्या क्षेत्रात खरोखर प्रगती करु इच्छित असाल, पुढे जाण्याची (Promotion) तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ (Best) होण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या क्षेत्रातील जितक्या बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास तुम्ही कराल, तितका तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल. तसेच यामुळे तुम्ही तुमच्या हाताखालील लोकांच्या कामाचे नेमकेपणाने अवलोकन करू शकाल. त्यामुळे आपल्या क्षेत्राशी संबंधित सर्व बारकावे समजून घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs

    पुढील बातम्या