Home /News /career /

Career Tips: विद्यार्थ्यांनो, आता शिक्षणासोबतच कमवा भरघोस पैसे; करा 'हे' Part Time Jobs

Career Tips: विद्यार्थ्यांनो, आता शिक्षणासोबतच कमवा भरघोस पैसे; करा 'हे' Part Time Jobs

पार्ट टाइम जॉब तुमच्यासाठी करिअरचा उत्तम पर्याय ठरतो.

पार्ट टाइम जॉब तुमच्यासाठी करिअरचा उत्तम पर्याय ठरतो.

तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हीही पार्ट टाइम जॉब (Which part time job is better) करू शकता. चला तर जाणून घेऊया पार्ट टाइम जॉबची संधी.

    मुंबई, 18 डिसेंबर: आजकालच्या काळात प्रत्येकजण पैसे कमवण्याचं साधन (How to gain Money) शोधत आहे. अगदी गृहिणींपासून तर कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकजण काम करून पैसे कमवण्याची इच्छा दाखवत आहे. मात्र यासाठी पैसे (Money tips) नक्की कसे कमावणार याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. Part Time Jobs करून हे करणं (best Part time Jobs) शक्य आहे. जर तुम्हालाही पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हीही पार्ट टाइम जॉब (Which part time job is better) करू शकता. चला तर जाणून घेऊया पार्ट टाइम जॉबची संधी. कन्टेन्ट रायटिंगमध्ये स्कोप (Content Writing)      पार्ट टाईम जॉब हा पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर लिहायला आवडत असेल तर तुम्ही ऑनलाइन लेखनाचे काम सुरू करू शकता. Glassdoor नुसार, एक फ्रीलान्स लेखक एका महिन्यात 16,000 रुपये कमवू शकतो. Fiverr, Upwork, Freelancer, Guru यामध्ये जॉब मिळू शकतो. शिक्षक बनून कमवा पैसे (Tutor Jobs) अध्यापन हा करिअरच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे कारण यामुळे तुमचे ज्ञान वाढते. फक्त 1 तास अभ्यास करूनही तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुम्ही तुमची शिकवण्याची पद्धत आणि विषय तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिकवण्याची क्रेझ खूप वाढली आहे. तुम्ही व्हाईटहाट जूनियर, कुमथ, वेदांतू या काही अप्लिकेशन्समध्ये ट्यूटर म्हणून काम करू शकता. . शिक्षण सुरु असताना करिअरमध्ये प्रगती करायचीये? पार्ट टाइम जॉब्स ठरतील फायदेशीर डेटा एंट्री बनेल कमाईचं साधन (Data entry Jobs) घरी बसून डेटा एन्ट्री जॉब करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी फास्ट टायपिंग आणि डेटा मॅनेजमेंटच्या पद्धती माहीत असायला हव्यात. Glassdoor च्या मते, होम डेटा एंट्री ऑपरेटरचे काम दरमहा सुमारे 16-30 हजार रुपये कमवू शकते. यानंतर LinkedIn, Quikr, Upwork या कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो. तुमच्या आवडीच्या विषयावर ब्लॉग (Blogging) जर तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल, तर तुम्ही त्याचा वापर कमाईसाठी देखील करू शकता . आजकाल ब्लॉगिंग देखील ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्ही फॅशन, खाद्यपदार्थ, प्रवास इत्यादीसारख्या तुमच्या आवडीचे बीट्स निवडू शकता. ब्लॉगर क्लिक, जाहिराती आणि संलग्न मार्केटिंगच्या आधारे पॆसे कमावू शकतो. क्रिएटिव्हिटी ठरेल फायदेशीर (Creativity Jobs) जर तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंगचे काम करू शकता. ग्राफिक डिझायनरच्या अनुभवानुसार फ्रीलांसर सुमारे 20-50 हजार कमवू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs, Tips

    पुढील बातम्या