मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: MBA नंतर तब्बल 40 लाखांपर्यंत पॅकेज हवंय ना? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

Career Tips: MBA नंतर तब्बल 40 लाखांपर्यंत पॅकेज हवंय ना? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

Career After MBA: आज आम्ही तुम्हाला MBA नंतरच्या काही करिअर ऑप्शन्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 सप्टेंबर: व्यवसाय किंवा मॅनेजमेंटमध्ये आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर MBA करण्याची प्रचंड इच्छा असते. पदवीनंतर MBA करून अनेक विद्यार्थी चांगला जॉब मिळवतात. मात्र चांगला जॉब मिळवण्यासाठी चांगल्या MBA कॉलजेमधून शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा चांगल्या कॉलेजमधून हशिक्षण घेऊनही तुम्हाला जॉब मिळत नाही. किंवा पुढे शिकण्याची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला MBA नंतरच्या काही करिअर ऑप्शन्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

एमबीए विविध व्यवसाय आणि व्यवस्थापन प्रवाहांमध्ये स्पेशलायझेशन ऑफर करते. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्यापूर्वी हा कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल, याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या एमबीए कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल.

12वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएटना थेट 1,50,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा Apply

फायनान्स स्पेशालिस्ट

एमबीए कोर्स केल्यानंतर फायनान्स स्पेशालिस्ट म्हणूनही करिअर करता येते. हा कोर्स केल्यानंतर कॉर्पोरेट फायनान्स, कॉर्पोरेट बँकिंग, क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट, अॅसेट मॅनेजमेंट, हेज फंड मॅनेजमेंट, प्रायव्हेट इक्विटी, ट्रेझरी, सेल्स आणि ट्रेडिंगमध्ये फायनान्स स्पेशालिस्ट म्हणून करिअर करता येते. एमबीए केल्यानंतर, फायनान्स स्पेशालिस्ट म्हणून तुम्ही वर्षाला 4 ते 6 लाख रुपये कमवू शकता. वाढत्या अनुभवासह, तुम्ही या क्षेत्रात वर्षाला 10 लाख रुपये कमवू शकता.

Business Analyst

एमबीए कोर्स केल्यानंतर कोणत्याही खासगी संस्थेत Business Analyst म्हणून करिअर करता येते. यामध्ये ग्राहकाचे वर्तन, बाजारपेठेतील कल आणि व्यावसायिक बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींचे विश्लेषण उत्पादनासाठी केले जाते. आरोग्यसेवा, वित्तीय संस्था, ई-कॉमर्स, सल्लागार समूह कंपन्या ब्रँड Business Analyst ची नियुक्ती करतात. Business Analyst म्हणून वर्षाला 5-8 लाख कमवू शकतात आणि अनुभव घेतल्यानंतर वर्षाला 40 लाखांपर्यंत कमवू शकता.

मॅनेजमेंट प्रोफेशनल

कोणतीही कंपनी, कार्यालय, रुग्णालय, संस्था चालवण्यासाठी व्यवस्थापनाची गरज असते. एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करता येते. खरेदी व्यवस्थापन, इन्व्हेंटरी व्यवस्थापन, विक्रेता व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी तयार करण्यातही व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर, दरवर्षी 6-10 लाख, मध्यम स्तरावरील व्यावसायिकांसाठी 15-20 लाख आणि उच्च स्तरावरील व्यावसायिकांसाठी 28-40 लाखांचे पॅकेज मिळतं.

मार्केटिंग

सध्याच्या काळात लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. स्पर्धात्मक मार्केटिंग , व्यवसाय मार्केटिंग , ऑनलाइन मार्केटिंग , विश्लेषणात्मक मार्केटिंग , ग्राहक संबंध मार्केटिंग , जाहिरात व्यवस्थापन, उत्पादन आणि ब्रँड व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात करिअर करता येते. एमबीए केल्यानंतर मार्केटिंगमध्ये करिअर करणारे उमेदवार वर्षाला 8 ते 10 लाख रुपये कमवू शकतात. अनेक कंपन्या जाहिराती किंवा क्लायंटच्या स्थितीवर आधारित मार्केटिंग टीमला बोनस देखील देतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, MBA