Home /News /career /

Career Tips: अवघ्या काही दिवसांमध्ये मिळू शकते भरघोस पगाराची नोकरी; 'हे' कोर्सेस एकदा कराच

Career Tips: अवघ्या काही दिवसांमध्ये मिळू शकते भरघोस पगाराची नोकरी; 'हे' कोर्सेस एकदा कराच

हे शॉर्ट टर्म कोर्सेस (Job oriented short time courses) केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोकरी मिळू शकेल.

    मुंबई,12 मार्च: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना लेगच पैसे कमवण्याची (How to earn instant Money) इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब (Jobs after 10th and 12th) हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागची एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस (Short term courses after 12th) करून नोकरी करू शकता. अर्थात नोकरीत (short term courses for jobs) समोर जाण्यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण महत्त्वाचं असेल मात्र हे शॉर्ट टर्म कोर्सेस (Job oriented short time courses) केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोकरी मिळू शकेल. चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल. डिप्लोमा इन वेब डिझायनिंग 12वी ते ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेले लोक डिप्लोमा इन वेब डिझायनिंग कोर्स (Web Designing Courses) करू शकतात. ते 3 महिने ते 9 महिन्यांत पूर्ण होऊ शकते. कोर्स पूर्ण केल्यानंतर वेब डिझायनर (How to become Web Designer), डिझायनिंग एक्झिक्युटिव्ह इत्यादी पदांवर नोकरी मिळू शकते. 'हे' आहेत भरघोस पगार देणारे Government Jobs; अशा पद्धतीनं करा Preparation डिजिटल मार्केटिंग कोर्स गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमांची (Digital Marketing courses) मागणी खूप वाढली आहे. 12वी पास ते ग्रॅज्युएट पर्यंत कोणीही हे करू शकतो. त्याचा कालावधी 3 महिन्यांपासून 12 महिन्यांपर्यंत बदलतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही एक्झिक्युटिव्ह, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर (How to become digital marketing Manager), डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट आणि डिजिटल मार्केटर या पदांसाठी अर्ज करू शकता. तुम्हीही Government Jobs साठी अभ्यास करताय? मग 'या' टिप्समुळे स्वप्न होईल पूर्ण हॉटेल मॅनेजमेंट कोर्स हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management Courses) कोर्स हा सदाबहार मानला जातो. यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अर्ज करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो. हा कोर्स केल्यानंतर शेफ (How to become Chef), रिसेप्शनिस्ट, रूम सर्विस स्टाफ, मॅनेजर इत्यादी पदांसाठी अर्ज करता येतो.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Jobs, Online education

    पुढील बातम्या