मुंबई, 29 मार्च: मुलाखत सुरु होण्यापासून ते संपतपर्यंत संपूर्ण मुलाखत (Interview Tips in Marathi) महत्त्वाची असते. मुलाखत सुरु होण्यावेळी जितका आत्मविश्वास (How to be confident in Interview) तुमच्यात असतो तितका आत्मविश्वास मुलाखत संपतपर्यंत (actions to take after job Interview) टिकवणं आवश्यक आहे. मात्र अनेकजण असं करत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही जॉब मुलाखत संपताना (How to leave Interview place) करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया. पोस्टबद्दल उत्सुकता दाखवा तुम्ही दाराबाहेर जाण्यापूर्वी, तुम्हाला जी पोस्ट का हवी आहे हे पुन्हा सांगण्यासाठी एक मिनिट काढा, मुलाखत संपल्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी मुलाखत घेणाऱ्यांना पुन्हा पटवून देणायचा प्रयत्न करा के तुम्ही या पोस्टसाठी का पात्र आहात. पण यासाठी जास्तीत जास्त तीस सेकंद घ्या. तुमच्या बोलण्यातून त्या पोस्टबद्दल आत्मविश्वास दिसणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या Entrance Exams देणं आवश्यक; जाणून घ्या संपूर्ण माहिती पुढील स्टेप्सबद्दल नक्की विचारा बरेचदा नव्वद टक्के उमेदवार हे विचारण्यास विसरतात कि मुलाखतीनंतर निवड प्रक्रियेतील पुढील स्टेप काय असणार आहे? यामुळे अनेकांची नोकरी हातची जाऊ शकते. त्यामुळे मुलाखतीनंतरच्या स्टेप्स जाणून घ्यायला संकोच करू नका. जर मुलाखत हीच शेवटची स्टेप असेल तर अशा वेळी मुलाखत घेणाऱ्यांना निवड झाल्यानंतरच्या प्रोसेसबद्दल विचारा. प्रश्न विचारण्यास विसरू नका मुलखात घेणारे बरेच तुम्हालाही प्रश्न विचारण्याची संधी देतात. ही तुम्हाला चमकण्याची ही एक प्रमुख संधी आहे असं समजून प्रश्न विचारा. .इंटरव्ह्यूचे चांगले प्रश्न विचारून पूर्ण फायदा घ्या ज्यामुळे तुम्हाला ऑनलाइन न सापडणारी माहिती मिळेल. जसे की इथे जॉब करताना तुमचा अनुभव कसा आहे? इथे जॉब करताना पुढील शिक्षणासाठी संधी मिळेल का? अशाप्रकारचे प्रश्न तूंहीही विचारु शकता. महिलांनो, नर्सिंग क्षेत्रात तुच्यासाठी आहेत करिअरच्या अनेक संधी; नर्स होण्यासाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती Thank You ई-मेल पाठवा आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चारपैकी तीन नोकरी शोधणारे मुलाखतीनंतर थँक्स नोट (how to send Thank You Emails) पाठवण्याची तसदी घेत नाहीत. स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्याला धन्यवाद-इमेल लिहिण्यासाठी वेळ काढा. गाडी तुम्ही भेटलेल्या रिसेप्शनिस्टपासून तर मुलाखत घेणाऱ्या प्रत्येकाला Thank You ई-मेल पाठवा. यामुळे तुमचं चांगला इम्प्रेशन तयार होईल आणि तुम्हाला नोकरी मिळण्याची संधी वाढेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.