Home /News /career /

Career Tips: तुम्हालाही फिरण्याची प्रचंड आवड आहे? मग टूर मॅनेजर म्हणून करा करिअर; कसं ते वाचा

Career Tips: तुम्हालाही फिरण्याची प्रचंड आवड आहे? मग टूर मॅनेजर म्हणून करा करिअर; कसं ते वाचा

टूर मॅनेजर कसं व्हावं

टूर मॅनेजर कसं व्हावं

आज आम्ही तुम्हाला टूर मॅनेजर कसं व्हावं (career in Tour management) आणि यामध्ये करिअरची संधी कशी मिळू शकेल याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

    मुंबई, 29 मार्च: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटन (Tourism in India) पूर्णपणे बंद होतं. मात्र आता संपूर्ण देशातील पर्यटन सुरळीत सुरु झालं आहे. त्यामुळे फिरण्याची आणि पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोणत्याही ठिकाणी पर्यटनासाठी (best tourism in Maharashtra) जायचं म्हंटलं की सोबत कुणीतरी अशी व्यक्ती असणं गरजेचं आहे जिला त्या पर्यटन स्थळाबद्दल सर्व माहिती आहे. हेच काम असतं टूर मॅनेजरचं (Career as Tour Manager). कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्यासाठी लोकांना एकत्रित करणे आणि त्यांचा संपूर्ण टूर सुरळीत (How to become Tour Manager) आणि उत्तम पार पडावा यासाठी मॅनेजमेंट (How to do tour management) करणे हे टूर मॅनेजरचं (Job Profile of Tour Manager) काम. तुम्हाला या कामाची आवड असेल तर ही बातमी फक्त तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला टूर मॅनेजर कसं व्हावं (career in Tour management) आणि यामध्ये करिअरची संधी कशी मिळू शकेल याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. टूर मॅनेजर होण्यासाठी पात्रता टूर मॅनेजर होण्यासाठी कोणतीही विशेष पात्रता आवश्यक नाही. टूर मॅनेजर होण्यासाठी व्यक्तीला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतात उमेदवार किमान 50% एकूण गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी एव्हिएशन मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट यासारख्या संबंधित क्षेत्रात पदवीधर पदवी प्राप्त केलेली असावी. ट्रॅव्हल अँड टूरिझममध्ये IATA प्रमाणपत्र/डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. पर्यटन उद्योगाशी संबंधित कामाचा पूर्व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. टूर मॅनेजर होण्यासाठी, उमेदवारांकडे आवश्यक कौशल्ये असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, परदेशात शिक्षण घेण्यासाठी 'या' महत्त्वाच्या Entrance Exams देणं आवश्यक; जाणून घ्या संपूर्ण माहिती टूर मॅनेजर होण्यासाठी कोर्सेस टूर मॅनेजर होण्यासाठी तुम्ही देशातील विविध संस्थांमधून पदवी, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकता. त्याच्या प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापनातील प्रगत डिप्लोमा, एअरलाइन प्रवासातील मूलभूत अभ्यासक्रम, भाडे आणि तिकीट व्यवस्थापन, पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापनातील पीजी डिप्लोमा करू शकता. करिअर स्कोप अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सरकारी तसेच खाजगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळू शकते. कॉक्स अँड किंग्स, एअरलाइन्स, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, MakeMyTrip.com सारख्या काही खाजगी कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळत राहतात. याशिवाय पर्यटन विभाग, हॉटेल इंडस्ट्री, एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सीमध्ये तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत. महिलांनो, नर्सिंग क्षेत्रात तुच्यासाठी आहेत करिअरच्या अनेक संधी; नर्स होण्यासाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती इतका मिळू शकतो पगार टूर मॅनेजर बनण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकता. तथापि, जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात टूर ऑपरेटर म्हणून काम सुरू केले तर सुरुवातीला तुम्हाला महिन्याला 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities

    पुढील बातम्या