मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ब्रेक तो बनता है! आमिर खान प्रमाणे तुम्हीही विचार करा करिअरमधल्या Hiatus चा; काय आहे हा फंडा?

ब्रेक तो बनता है! आमिर खान प्रमाणे तुम्हीही विचार करा करिअरमधल्या Hiatus चा; काय आहे हा फंडा?

करिअरमधल्या Hiatus चा काय आहे  फंडा

करिअरमधल्या Hiatus चा काय आहे  फंडा

एक सामान्य माणूस म्हणून आपणही Hiatus वर जाऊ शकतो का? याचा नेमका फायदा काय होतो? आणि तुम्ही का Hiatus घ्यायला हवं? हेच जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 नोव्हेंबर: रोजच्या व्यस्त आयुष्यात एक दिवस तरी सुखाचा आणि शांततेचा मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ऑफिस, कॉलेज आणि घरकामात आपण इतके बिझी होऊन जातो की आपल्याला असा वेळ मिळणं कठीण असतं. अगदी सुटीच्या दिवशी सुद्धा नहमीपेक्षा जस कामं आपल्या टू-डू लिस्टमध्ये असतात. मग असा मोकळा वेळ मिळणार तरी कसा? बरं काही दिवस सुटी घेऊन कुटुंबास फिरायला जातो म्हटलं तर सुट्या मिळू शकत नाहीत. अशी स्थिती आपली देशातच नाही तर सर्वत्र आहे. मात्र यावर एक रामबाण उपाय काही दाक्षिणात्य देशांनी शोधून काढला आहे. हा उपाय म्हणजे Hiatus (हायटस). आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? चला तर मग जाणून घेऊया Hiatus म्हणजे नक्की काय? आई याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो.

अलीकडेच अभिनेता आमिर खानची एक बातमी तुमच्या डोळ्यांखालून गेली असावी. ज्यात त्यानं सर्व प्रकारच्या कामांपासून वर्ष ते दीड वर्ष अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत तो कुठलीच प्रोफेशनल कामं करणार नाही. पूर्णपणे आराम करेल आणि स्वतःच्या शरीरासह मेंदूलाही आराम देईल. याच प्रकाराला म्हणतात Hiatus.

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट

Hiatus चा सरळ अर्थ होतो कोणत्याही कामापासून काही काळासाठी दूर जाणे किंवा ब्रेक घेणे. बरं असं करणारा आमिर खान हा पहिला आहे का? तर नाही. वेस्टर्न देशांमध्ये असे अनेक मोठा कलाकार आहेत ज्यांनी हे केलाय आणि त्यांच्या आयुष्यात बदल केले आहेत. BTS नावाच्या बँडबद्दल तुम्ही ऐकलं असेल तेही सध्या Hiatus वर आहेत. पण हे सर्व मोठे लोकं आहेत. एक सामान्य माणूस म्हणून आपणही Hiatus वर जाऊ शकतो का? याचा नेमका फायदा काय होतो? आणि तुम्ही का Hiatus घ्यायला हवं? हेच जाणून घेऊया.

करिअरसाठी Hiatus घेण्याचे काही फायदे

Hiatus म्हणजेच ब्रेक. आयुष्यात काही दिवस सर्व कामं बाजूला ठेऊन स्वतः किंवा आपल्या कुटुंबासह कुठेतरी दूर शांत जागी निघून जाणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला रोजच्या ताण तणावापासून सुटका तर मिळतेच पण त्याहूनही अधिक मनःशांती मिळते.जी पुढे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायद्याची असू शकते.

रोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी असतात या शिकायच्या असतात ज्या तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करू शकतात. मात्र बिझी शेड्युलमुळे तुम्ही त्या गोष्टी शिकू शकत नाही. मात्र Hiatus घेतल्यामुळे तुम्हाला या नवीन गोष्ट शिकता येतील आणि पुन्हा कामावर गेल्यानंतर तुम्ही प्रमोशनसाठी अप्लाय करू शकाल

MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी घोषणा; अधिकारी पदांच्या 1-2 नव्हे 623 जागांसाठी भरती; करा अर्ज

तसंच Hiatus घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचे छंद जोपासू शकता. कोणाला पर्वतांवर जाण्याची आवड असेल किंवा कोणाला इतर गोष्टींची आवड असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. याने तुमचं माईंड नवीन काम करण्यासाठी उत्साही असेल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हजे Hiatus ला गेल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो. इतकी वर्ष टेन्शनमध्ये घालवलेल्या क्षणांना तुम्ही मेडिटेशन करून घालवू शकता. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं.

काही दिवसांचा ब्रेक घेऊन आल्यानंतर तुम्हालाच तुमच्यात प्रचंड फरक जाणवू लागेल कधी नव्हे ते अंगात काहीतरी नवीन करण्याची एनर्जी येईल. ऑफिसमध्येही काम करण्यात एक वेगळाच उत्साह तुम्हाला जाणवेल. याच सर्व गोष्टी करिअरध्ये पुढे जाण्यात तुम्हाला मदत करतील. म्हणून एकदा तरी Hiatus घेणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Aamir khan, Career, Career opportunities, Job