मुंबई, 16 जानेवारी: आजकालच्या काळात सोशल मीडिया
(Social media) आणि visual मिडीयमची
(Visual medium) प्रचंड धूम आहे. अगदी मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना टीव्ही आणि इतर कार्यक्रम बघायला आवडतात. या टीव्हीवरील डेली सोप्समध्ये किंवा सिनेमांमध्ये काम करणारे कलाकार अनेकांना आवडतात. काही जण तर या कलाकारांचे मोठे फॅन असतात. कलाकार ज्याप्रमाणे वागतील बोलतील तसे वागतात बोलतात. अनेकांना यामुळे अभिनयाची
(Career in Acting) आवड निर्माण होते. पण अभिनेता होण्यासाठी किंवा टीव्ही जगतात नाव मिळवण्यासाठी नक्की
(How to make career in TV industry) काय करावं? हे तुम्हाला माहिती आहे का? टेन्शन नको. टीव्हीवर झकळण्यासाठी अभिनय
(how to learn acting) येणं आवश्यक आहे आणि अभिनय नक्की कुठे शिकावा? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
मनोरंजन क्षेत्रातील बहुतेक लोकांना कोणत्याही प्रकारच्या विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. म्हणूनच या क्षेत्रात करिअर
(Career tips) सुरू करताना तुमच्या क्षमतेशी कोणते करिअर
(Career tips in Acting) जुळते हे शोधणे हा एक चांगला मार्ग आहे. तुमच्या कौशल्यांचे मूल्यांकन करा: तुम्ही कोणत्या क्षेत्रात चांगले आहात ते शोधा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही तुमच्या मनोरंजन करिअरच्या मार्गावर चालत असताना यातील अनेक कौशल्ये कामी येतील. या क्षेत्रात दीर्घकाळ राहण्यासाठी तुम्ही संयम, मेहनती असले पाहिजे.
आजच्या स्पर्धेच्या युगात ही 10 कौशल्यं तुमच्याकडे असलीच पाहिजे!
या इन्स्टिट्यूट्समध्ये घेऊ शकता शिक्षण (Top Acting Institutes)
बॅरी जॉन अभिनय संस्था, मुंबई
किशोर नमित अभिनय संस्था, मुंबई
ICE अभिनय संस्था, दिल्ली
अनुपम खेर अभिनय संस्था, मुंबई
किशोर नमित अभिनय संस्था, मुंबई
व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई
एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, नोएडा
अशा पद्धतीनं शोधा जॉब
जेव्हा तुम्ही मनोरंजन क्षेत्रात तुमची पहिली नोकरी शोधत असाल, तेव्हा तुम्हाला अनेकदा काही प्रकारचे रेझ्युमे आवश्यक असतात. तुमच्या पहिल्या दिवस, महिना किंवा वर्षात "मोठा ब्रेक" येत नसेल तर काळजी करू नका. एक चांगला रेझ्युमे तयार करा आणि वेगवेगळ्या टीव्ही उद्योगांमध्ये संधी शोधत राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.