Home /News /career /

Career Tips: तुम्हालाही कम्प्युटर हाताळण्याची आवड आहे? मग हार्डवेअर-नेटवर्किंगमध्ये करा करिअर; कसं ते वाचा

Career Tips: तुम्हालाही कम्प्युटर हाताळण्याची आवड आहे? मग हार्डवेअर-नेटवर्किंगमध्ये करा करिअर; कसं ते वाचा

Hardware Networking Course करून तुम्ही चांगल्या पगाराचा जॉब मिळवू शकता.

Hardware Networking Course करून तुम्ही चांगल्या पगाराचा जॉब मिळवू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा एका फिल्डबद्दल माहिती (career Tips Marathi) देणार आहोत ज्यामध्ये करिअर करून तुम्ही भरघोस पैसे कमवू शकता.

    मुंबई, 03 जानेवारी : संपूर्ण जग सर्वच बाबतीत पुढे जात असताना आता टेक्नॉलॉजीध्येही (Latest Technology) प्रचंड मोठे बदल होऊ लागले आहेत. एकेकाळी वही पेन आणि इतर गोष्टींची जागा आता कम्प्युटर (Computer), लॅपटॉप्स (Laptops) आणि स्मार्टफोन्सनी (Smartphones) घेतली आहे. अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच जण कम्प्युटर आणि लॅपटॉप्स हाताळत आहेत. त्यामुळे या सर्व इलेकट्रॉनीक वस्तू हाताळण्यासोबतच रिपेअर (How to repair electronics devices) करण्याचीही गरज असते. त्यातही प्रोफेशनल्सची डिमांड प्रचंड वाढली आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा एका फिल्डबद्दल माहिती (career Tips Marathi) देणार आहोत ज्यामध्ये करिअर करून तुम्ही भरघोस पैसे कमवू शकता. हो. आम्ही बोलतोय हार्डवेअर-नेटवर्किंगबद्दल (Hardware Networking Career tips). आता अनेकांसाठी हे शब्द काही नवीन नाहीत. मात्र अनेकांना याबद्दल माहितीच नाही. हा कोर्स (Hardware Networking Course) करून तुम्ही चांगल्या पगाराचा जॉब मिळवू शकता. तसंच कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. फ्रिलांसींगही (Freelancing Tips) करू शकता. चसला तर मग जाणून घेऊया हार्डवेअर-नेटवर्किंगबद्दल. JOB ALERT: नवी मुंबई पोलीस दलात 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; 35,000 पगार हार्डवेअर-नेटवर्किंग म्हणजे नक्की काय? जिथे कॉम्प्युटर आणि त्याच्या उपकरणांचा वापर जास्त होईल, तिथे तेही खराब होतील. फक्त त्यांची दुरुस्ती करणे आणि काही संगणक एकत्र जोडणे म्हणजे संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग. फक्त कॉम्प्युटर दुरुस्त करणे याला हार्डवेअर आणि नेटवर्किंग म्हणतात असे नाही. कॉम्प्युटर असेंब्लींग करणे, कॉम्प्युटरचा कोणताही भाग बदलणे किंवा नवीन भाग बसवणे इत्यादी गोष्टी संगणकाच्या हार्डवेअरमध्ये येतात. यातील करिअरच्या संधी (Career Opportunity in Hardware Networking) विद्यार्थ्यांची मागणी आणि वेळेनुसार या क्षेत्रात अनेक डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रम (Diploma Degree Courses in Hardware Networking) उपलब्ध आहेत. तुम्ही दहावी पास किंवा पदवीधर असाल, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधील अनेक डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. CHNE+ : Jetking Certified Hardware & Networking engineer , MNA+: Master in Network administrator, CCNA, Network Security, Storage Technology, Cloud computing, Mail support, PC Trable, Hardware Specialist हे कोर्सेस ही तुम्ही करु शकता. Career Tips: करिअरमध्ये स्थैर्यासोबतच यशही मिळवायचं? मग या गोष्टी ठेवा लक्षात या क्षेत्रातील जॉब्सच्या संधी या क्षेत्राला खूप मागणी आहे, त्यामुळे तुम्हाला सहज नोकऱ्या मिळू शकतात. , सुरुवातीला तुम्हाला या क्षेत्रात 15-20 हजारांच्या आसपास पगार मिळेल आणि तो काळानुसार वाढतच जाऊ शकतो. याशिवाय जर तुमची Microsoft, Apple, TCS, Wipro सारख्या मोठ्या कंपनीत निवड झाली तर तुम्हाला सुरुवातीपासून चांगले पॅकेज मिळू शकतं.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या