मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career Tips: कोणतीही जॉब ऑफर स्वीकारण्याआधी 'या' गोष्टी एकदा नक्की बघा; भविष्यात व्हाल यशस्वी

Career Tips: कोणतीही जॉब ऑफर स्वीकारण्याआधी 'या' गोष्टी एकदा नक्की बघा; भविष्यात व्हाल यशस्वी

तुम्हाला आलेल्या ऑफर लेटरमध्ये या गोष्टी नक्की तपासा.

तुम्हाला आलेल्या ऑफर लेटरमध्ये या गोष्टी नक्की तपासा.

कोणतीही जॉब ऑफर स्वीकारण्याआधी ऑफर लेटरमध्ये (parameters to check before accepting any job letter) पुढील गोष्टी आहेत ना याची खात्री नक्की करून घ्या.

मुंबई, 05 नोव्हेंबर: आजकाल खाजगी क्षेत्रात (Private Sector jobs) नोकऱ्यांची हमी नाही. कंपनीच्या निधीत चढ-उतार होत असल्याने कंपन्या कॉस्ट कटिंगचा (Cost cuttings in Companies) मार्ग काढतात. यामध्ये सर्वप्रथम त्या कर्मचाऱ्यांची छाटणी केली जाते, जे आपले काम नीट करत नाहीत. जर तुम्हीही असे कर्मचारी असाल तर तुमचाही जॉब जाऊ शकतो. मात्र जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं तर तोच जॉब तुमचा ड्रीम जॉब (How to get dream jobs) ठरू शकतो. ड्रीम जॉबचा अर्थ फक्त तुमच्या आवडीच्या कंपनीत नोकरी (Job in top companies in India) मिळवणे असा नाही. त्यात आपल्याला आपल्या जीवनात हव्या असलेल्या सुखसोयींचाही समावेश होतो. त्यामुळे कोणतीही जॉब ऑफर स्वीकारण्याआधी ऑफर लेटरमध्ये (parameters to check before accepting any job letter) पुढील गोष्टी आहेत ना याची खात्री नक्की करून घ्या.

पगारापेक्षा कंपनी महत्त्वाची

सुरुवातीला ऑफर बाजारानुसार योग्य आहे की नाही? हे तपासा. अनेक कंपन्या सुप्रसिद्ध असूनही पैसे देण्यास टाळाटाळ करतात. तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पगारापेक्षा कंपनीच्या नावावर जास्त लक्ष द्या. CV वर मोठ्या ब्रँडच्या लेबलमुळे पुढे पगार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करा. पगार कमी मिळत असेल तरी कंपनी महत्त्वाची या तत्वावर काम करा.

कंपनी नवीन असेल तर...

जर तुम्हाला नवीन कंपनीकडून नोकरीची ऑफर आली असेल आणि तुम्ही जोखीम घेऊ शकत असाल तर ते स्वीकारा. मात्र त्यापूर्वी कंपनीची पार्श्वभूमी तपासा. अनेकवेळा कंपनी मोठ्या आवाजात सुरू केली जाते, पण अपेक्षित परिणाम न मिळाल्याने व्यवस्थापनाचा उत्साह काही वेळातच मावळतो आणि कंपनी बंद पडते. त्यामुळे अशा कंपन्यांमधील नोकरी स्वीकारताना वरिष्ठांचा सल्ला घेण्यास विसरू नका.

NEET UG: मेळघाट आणि गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी

ट्रॅव्हलिंग टाइम तपासा

तुमचे घर ऑफिसपासून लांब असले तरी काळजी करू नका. नवीन कंपनीला कॅब सुविधेबद्दल विचारा. कॅबची सुविधा नसेल पण एखाद्यासोबत कारपूल करून ऑफिसला जाण्याचा पर्याय असेल तर त्याचाही विचार करता येईल. टाइमपास करण्यासाठी जाताना तुम्ही संगीत ऐकू शकता किंवा वेब सिरीज पाहू शकता.

एकाच वेळी अनेक ऑफर्स आल्यास...

काहीवेळा तुम्ही एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये अर्ज केल्यास, ऑफर एकापेक्षा जास्त ठिकाणांहूनही मिळते. अशा परिस्थितीत कोणतीही कंपनी जॉईन करण्यापूर्वी सर्व कंपन्यांच्या ऑफर्स आणि सुविधा तपासा. तुमच्या करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेताना, कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूकडे लक्ष द्या आणि योग्य कंपनीची निवड करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Tips