जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: तुम्हीही Creative असाल तर VFX मध्ये करा करिअर; मोठ्या फिल्म्समध्ये मिळू शकतं काम

Career Tips: तुम्हीही Creative असाल तर VFX मध्ये करा करिअर; मोठ्या फिल्म्समध्ये मिळू शकतं काम

Career Tips: तुम्हीही Creative असाल तर VFX मध्ये करा करिअर; मोठ्या फिल्म्समध्ये मिळू शकतं काम

आज आम्ही तुम्हाला यामध्ये करिअर (How to learn VFX) कसं करायचं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च: इतर क्षेत्रांमध्ये जशी टेक्नॉलॉजी समोर जाऊ लागली आहे तशी आता सिनेमाच्या क्षेत्रातही टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे व्हिज्युअल प्रेझेंटेशनही (Visual Presentation) सिनेमांमध्ये वाढू लागलं आहे. निरनिराळ्या एडिटिंग टेक्निक्स (Editing Techniques) येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर आता बाहुबली सारख्या भारतीय सिनेमामध्ये आणि हॉलिवूडमध्येही VFX (Career in VFX) कघी वापर वाढू लागला आहे. एखादी गोष्ट खरी नसेल तरी ती खरीखुरी वाटेल असं चित्र दाखवण्याचं काम VFX (How to do career in VFX) मुले शक्य होतं. वाढत्या डिमांड सोबतच या क्षेत्रात करिअरच्या संधीही (Career in VFX) वाढू लागल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यामध्ये करिअर (How to learn VFX) कसं करायचं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Career Tips: Ethical Hacking म्हणजे काय? यामध्ये कसं करता येईल Career; वाचा ही शैक्षणिक पात्रता आवश्यक VFX क्षेत्रात करिअर बनण्यासाठी उमेदवार कोणत्याही प्रवाहातून 12वी उत्तीर्ण असावा. त्यानंतर VFX मध्ये सर्टिफिकेट, डिग्री आणि डिप्लोमा सारखे कोर्स करता येतात. सर्टिफिकेट कोर्सचा कालावधी 3 ते 6 महिने आणि डिप्लोमा कोर्स 12 ते 15 महिने आणि बॅचलर डिग्री 3 वर्षे आणि मास्टर डिग्री 2 वर्षे आहे. या अभ्यासक्रमांचे शुल्क वार्षिक 70 हजार ते 1 लाखांपर्यंत आहे. हे आहेत महत्त्वाचे कोर्सेस VFX मध्ये तुम्ही डिप्लोमा ते पदवीपर्यंत विविध अभ्यासक्रम करू शकता. येथे डिप्लोमा इन व्हीएफएक्स, डिप्लोमा इन थ्रीडी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स, मास्टर इन व्हिज्युअल आर्ट्स, बीएससी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, एमएससी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, बीएससी अॅनिमेशन, गेमिंग व्हीएफएक्स, अॅडव्हान्स प्रोग्रॅम इन व्हीएफएक्स, व्हीएफएक्स प्लस, व्हीएफएक्स इन मॅकिंग. इत्यादी अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमांदरम्यान तुम्हाला अॅनिमेशन, डिझायनिंग, लाइटिंग, मॉडेलिंग, लाईफ ड्रॉईंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, लेयरिंग, रेंडरिंग इत्यादी विषयांची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांनो, तुम्हीही JEE Mains परीक्षा देणार आहात? मग अशी करा Crack; वाचा इतकी मिळते सॅलरी या क्षेत्रात एंट्री लेव्हलवर तुम्हाला 20 ते 30 हजारांपर्यंत पगार मिळेल. अनुभवासोबतच तुमचा पगारही वाढतो. चांगला अनुभव आल्यानंतर तुम्हाला 70 हजार ते 1 लाखांपर्यंत पगार सहज मिळू शकतो. हॉलिवूड किंवा बॉलीवूड चित्रपटात काम करत असाल तर करोडोंमध्ये पगार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job alert
  • First Published :
जाहिरात
जाहिरात