Home /News /career /

Career Tips: Ethical Hacking म्हणजे नक्की काय? यामध्ये कसं करता येईल Career; जाणून घ्या सविस्तर

Career Tips: Ethical Hacking म्हणजे नक्की काय? यामध्ये कसं करता येईल Career; जाणून घ्या सविस्तर

एथिकल हॅकिंग क्षेत्रात करिअर

एथिकल हॅकिंग क्षेत्रात करिअर

आज आम्ही तुम्हाला एथिकल हॅकिंग क्षेत्रात करिअर (How to be Ethical Hacker) कसं करणार आणि कसं शिक्षण घेणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

    मुंबई, 17 मार्च: सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटला (Social Media Jobs) प्रचंड मागणी वाढली आहे. प्रत्येकजण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहे. मात्र यामुळे या क्षेत्रातील गुन्हेही वाढू लागले आहेत. काही गुन्हेगारी मानसिकतेचे लोकं सायबर क्राईम (Career as cyber crime expert) करून अनेकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे सायबर सिक्युरिटी (How to be cyber security expert) महत्त्वाची झाली आहे. म्हणूनच सायबर क्षेत्रात करिअर (Career in Cyber sector) करण्याच्या संधीही वाढल्या आहेत. Ethical Hacking याचाच एक भाग आहे. एथिकल हॅकिंगमध्ये (career in Ethical Hacking) हे करिअरच्या संधी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एथिकल हॅकिंग क्षेत्रात करिअर (How to be Ethical Hacker) कसं करणार आणि कसं शिक्षण घेणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. कोण असतात Ethical Hackers? Ethical Hackers हे कोणतीही सिस्टीम हाक करतात मात्र हे काम ते इंटरनेट प्रणालीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी करतात. एथिकल हॅकरचे मुख्य काम म्हणजे कंपनीच्या संगणक प्रणालीची सुरक्षा तपासणे, जेणेकरून ते कंपनीचा डेटा हॅक किंवा चोरी होण्यापासून वाचवू शकेल. तसेच, ते संगणक प्रणालीतील त्रुटी शोधतात, ज्यामुळे इतर हॅकर्स सायबर गुन्हे करतात. याशिवाय कोणताही सायबर गुन्हा घडला तरी सायबर गुन्हेगाराला पकडण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. म्हणूनच त्यांना सुरक्षा विश्लेषक, पेनिट्रेशन टेस्टर्स किंवा व्हाईट हॅकर्स म्हणूनही ओळखले जाते. हे एक आव्हानात्मक काम आहे, त्यामुळे आवश्यकतेनुसार चोवीस तास काम करणे अपेक्षित आहे. UPSC घरबसल्या एका प्रयत्नात Crack करायची आहे? मग 'ही' पुस्तकं येतील कामी हे स्किस्ल असणं आवश्यक करिअर करण्यासाठी संगणक आणि इंटरनेटचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रत्येक अपडेटची माहिती असावी लागेल. याशिवाय तांत्रिक ज्ञानाबरोबरच तुमची विचार करण्याची पद्धतही जबरदस्त असावी. ज्याप्रमाणे चोराला पकडण्यासाठी चोरासारखा विचार करावा लागतो, तसाच सायबरच्या जगात एथिकल हॅकरने गुन्हेगारासारखा विचार करायला हवा. तरच तो नव्या युगात होत असलेले सायबर गुन्हे समजून घेऊन त्याला आळा घालू शकेल. करिअरसाठी ही शैक्षणिक पात्रता आवश्यक तुम्हालाही यामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही पदवीनंतर इथिकल हॅकिंग कोर्स करू शकता. तसे, काही ठिकाणी हा अभ्यासक्रम बारावीनंतरही घेतला जातो. या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला संगणक प्रोग्रामिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, तुम्हाला प्रोग्रामिंग भाषा आणि विंडोज किंवा लिनक्स सारख्या संगणकात वापरल्या जाणार्‍या ऑपरेटिंग सिस्टमचे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे. Career Tips: Degree नंतर भरघोस पगाराची नोकरी हवीये; 'हे' PG डिप्लोमा कोर्सेस करा करिअरच्या संधी आजच्या काळात एथिकल हॅकर्ससाठी कामाची कमतरता नाही आणि आगामी काळात त्यांची मागणी वाढतच जाईल. कोर्स केल्यानंतर तुम्ही लष्कर, पोलिस, गुप्तचर विभाग, फॉरेन्सिक विभाग आणि इतर सरकारी विभागांमध्ये सेवा करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Cyber crime, Tips

    पुढील बातम्या