Home /News /career /

Career Tips: स्पेस सायन्स म्हणजे नक्की काय? काय आहेत यातील करिअरच्या संधी? जाणून घ्या

Career Tips: स्पेस सायन्स म्हणजे नक्की काय? काय आहेत यातील करिअरच्या संधी? जाणून घ्या

यामध्ये करिअरच्या संधी

यामध्ये करिअरच्या संधी

आज आम्ही तुम्हाला Space Science म्हणजे नक्की काय? आणि यामध्ये करिअरच्या संधी कशा पद्धतीनं उपलब्ध होतील याबद्दल माहिती देणार आहोत.

    मुंबई, 07 मार्च: आजकालच्या काळात स्पेस म्हणजेच अंतराळात होणाऱ्या गोष्टींवर (Career in Space Science) पृथ्वीवासीयांची नजर आहे. निरनिराळे देश मोठया ग्रहांवर मानवी जीवनाचा शोध घेत आहेत. भारतही यात मागे नाहीये. अनेक शास्त्रज्ञ यावर संशोधनही (Research about space) करत आहेत. म्हणूनच स्पेस सायन्स या विषयाला प्रचंड मागणी वाढली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Space Science म्हणजे नक्की काय? (What is Space Science) आणि यामध्ये करिअरच्या संधी (Career Scope in Space science) कशा पद्धतीनं उपलब्ध होतील याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. स्पेस सायन्स म्हणजे नक्की काय? 'स्पेस सायन्स' ही विज्ञानाची ती शाखा आहे, ज्या अंतर्गत पृथ्वीच्या पलीकडे कोट्यवधी ग्रह, उपग्रह, तारे, धूमकेतू, आकाशगंगा आणि इतर वैश्विक पिंडांचा अभ्यास केला जातो. याशिवाय त्या नियमांचा आणि परिणामांचा अभ्यास अवकाश शास्त्रांतर्गतही केला जातो, जे त्यांना चालवतात. अंतराळ विज्ञानातील करिअर ही हजारो रहस्ये उलगडून दाखवण्याची संधी आहे जी अद्याप न सुटलेली आहेत. करिअरमध्ये Success साठी Personality Development आवश्यक; आताच टिप्स करा फॉलो अंतराळ संशोधन अंतराळ संशोधन करणे हे खगोलशास्त्राचे कार्य आहे. यामध्ये आकाशगंगा, सौर यंत्रणा, तारे, कृष्णविवर, ग्रह इत्यादींचा समावेश होतो. ज्यावर संशोधन करून खगोलशास्त्र येथे घडणाऱ्या घटना जाणून घेता येतात. ऍस्ट्रोनॉट म्हणून करिअर अंतराळात पाऊल टाकून आपली स्वप्ने साकार करणारे हे खास लोक आहेत. स्पेस स्टेशनवर राहून ते विविध संशोधन करतात. त्यांचे काम खूप अवघड आहे. त्यांना अनेक महिने स्पेस स्टेशनमध्ये राहावे लागते. स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करता येऊ शकतं. यामध्ये अंतराळयान, उपग्रह, अंतराळ स्थानके, क्रीडा पायाभूत सुविधा आणि अंतराळ युद्धात गुंतलेली विविध उपकरणे डिझाइन करणे समाविष्ट आहे. Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यास करून प्रचंड कंटाळा आलाय? मग असे व्हा Refresh स्पेस इंजिनिअर एक अभियंता हा अवकाश संशोधनातील संपूर्ण मोहिमेचा जीव असतो. मोहिमेशी संबंधित सर्व उपकरणे तो डिझाइन करतो. एरोस्पेस, रोबोटिक्स, संगणक अभियांत्रिकी, मटेरियल सायन्स तसेच मेकॅनिकल आणि दूरसंचार अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रात या अभियंत्यांची प्रचंड क्षमता असते. यामध्येही करिअरच्या अनेक संधी आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Space, Tips

    पुढील बातम्या