मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career in Railway: लोको पायलट होण्याचं स्वप्न बघताय? मग 'या' महत्त्वाच्या परीक्षा नक्की द्या

Career in Railway: लोको पायलट होण्याचं स्वप्न बघताय? मग 'या' महत्त्वाच्या परीक्षा नक्की द्या

जर तुम्हालाही लोको पायलट (Loco Pilot Jobs In India) व्हायचं असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.

जर तुम्हालाही लोको पायलट (Loco Pilot Jobs In India) व्हायचं असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.

जर तुम्हालाही लोको पायलट (Loco Pilot Jobs In India) व्हायचं असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.

मुंबई, 05 नोव्हेंबर: लोको पायलट (Railway Driver) हे भारतीय रेल्वेमधील वरिष्ठ स्तरावरील पद आहे. लोको पायलट (Loco Pilot Eligibility) ट्रेन चालवण्याचं आणि ट्रेनच्या हालचाल दरम्यान तिची योग्य देखभाल करण्याचं काम करतात. ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही लोको पायलटची असते. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा जॉब आहे. जर तुम्हालाही लोको पायलट (Loco Pilot Jobs In India) व्हायचं असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.

लोको पायलटच्या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराला थेट लोको पायलट पद दिले जात नाही. भारतीय रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी एक प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. यानंतर लोको पायलट पदासाठी उमेदवारांना बढती दिली जाते. वेळ आणि अनुभवासह, उमेदवाराला वरिष्ठ लोको पायलट पद दिले जाते.

ही पात्रता असणं आवश्यक

लोको पायलट होण्यासाठी उमेदवार 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावा.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा ऑटोमोबाईल अशा कोणत्याही ट्रेडमध्ये 2 वर्षांचा I.T.I. अभ्यासक्रम अनिवार्य आहे.

यासाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.

लोको पायलट होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सवलत दिली जाते.

Career Tips: कोणतीही जॉब ऑफर स्वीकारण्याआधी 'या' गोष्टी एकदा नक्की बघा

या परीक्षा देणं आवश्यक

लोको पायलट होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांत रेल्वेची परीक्षा द्यावी लागेल.

लेखी परीक्षा -

ही परीक्षा १२० गुणांची असते. ते सोडवण्यासाठी उमेदवारांना ९० मिनिटे देण्यात आली आहेत. त्यात यशस्वी झाल्यानंतरच मुलाखतीसाठी बोलावले जाते.

मुलाखत -

यामध्ये उमेदवारांकडून या पदाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत जे उमेदवार यशस्वी होतात, त्यांची आरोग्य चाचणी केली जाते.

वैद्यकीय चाचणी-

यामध्ये अर्जदाराची नेत्र तपासणी अनिवार्यपणे केली जाते. या चाचणीमध्ये, आपण दूरच्या किंवा जवळच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो की नाही हे पाहिले जाते. या पदासाठी तीनही परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाते.

First published:
top videos

    Tags: जॉब