मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Advice: तुमच्या जॉब ऑफर लेटरमध्ये 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा; अन्यथा येऊ शकतात अडचणी

Career Advice: तुमच्या जॉब ऑफर लेटरमध्ये 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा; अन्यथा येऊ शकतात अडचणी

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही जॉब ऑफर लेटरमध्ये नक्की तपासायला हव्यात. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 ऑक्टोबर: कोणताही जॉब करायचा म्हंटलं की मुलाखत (Job Interview) देण्यापासून तर HR मुलाखतीपर्यंत (How to give HR Interview) सर्व गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करत आहेत त्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? याचा सर्व विचार करूनच तुम्हाला जॉब दिला जातो. जॉईन होताना तुम्हाला जॉब ऑफर लेटरही (Job Offer Letter) दिलं जातं. यामध्ये तुमची पोस्ट, तुमच्या संपूर्ण पगाराची माहिती आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देण्यात येते. मात्र या लेटरमध्ये (Things to check in Job offer Letter)अशाही काही गोष्टी असतात ज्या तपासणं अत्यंत महत्वाचं असतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही जॉब ऑफर लेटरमध्ये नक्की तपासायला हव्यात. चला तर मग जाणून घेऊया.

अनेक वेळा ऑफर लेटर आल्यावर आपल्याला इतका आनंद होतो की आपण ते जवळून बघायला विसरतो. यामुळे काही वेळा नंतर खूप त्रासाला समोरं जावं लागतं. जर तुमचं फायनल जॉब ऑफर लेटर आलं असेल तर त्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचण्यास विसरू नका.

पोस्ट बदलली जाऊ शकते

बर्‍याच वेळा तुमची पोस्ट म्हणजेच जॉब प्रोफाईल जॉब ऑफर लेटरमध्ये बदलली जाते. वास्तविक, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्यापेक्षा तुम्ही वेगळ्या पदासाठी अधिक योग्य आहात असे नियोक्त्याला वाटत असेल, तर तो बदलू शकतो. त्यामुळे ऑफर लेटरमध्ये तुमचा हुद्दा तपासायला विसरू नका.

Career Tips: Interview मध्ये असं द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, नोकरी होईल पक्की

रिपोर्टींग मॅनेजर कोण आहे हे बघा

ऑफर लेटरमध्ये तुमच्या रिपोर्टिंग मॅनेजरचा उल्लेख नसल्यास, ते स्वीकारण्यापूर्वी HR कडे निश्चितपणे याची खात्री करा. जर तुम्ही त्या व्यक्तीला आधीच ओळखत असाल किंवा तुम्हाला त्याच्याशी जुळवून घेता येणार नाही असे वाटत असेल तर तिथे काम करण्यात काही अर्थ नाही.

सॅलरी स्ट्रक्चर नक्की तपासा

जॉब ऑफर लेटर काळजीपूर्वक पाहताना, तुमची मूळ वेतन टक्केवारी आणि इतर घटक देखील तपासा. ऑफर केलेल्या पगारापेक्षा तुम्हाला काही वेगळे दिसल्यास, कृपया ताबडतोब HR चा सल्ला घ्या. जॉब ऑफर लेटरमध्ये इतर सुविधांचा उल्लेख आहे का तेही तपासा.

जॉइनिंग डेटबद्दल सहमती घ्या

HR शी बोलत असताना, तुमच्या जॉइनिंगची तारीख आणि जुन्या कंपनीच्या रिलीव्हिंग डेटबद्दल चर्चा करायला विसरू नका. तुमच्या ऑफर लेटरमध्ये तुम्ही ज्या तारखेला कंपनीत प्रत्यक्षात सामील होऊ शकता त्या तारखेचा उल्लेख केला पाहिजे. थोडासा बदल तुम्हाला नंतर महागात पडू शकतो.

First published:

Tags: Career opportunities, Tips