jobनवी दिल्ली, 4 मार्च : भारतीय तरुणांची सरकारी नोकरीसाठी पहिली पसंती आहे. सरकारी नोकरीसाठी येणाऱ्या अर्जांवरुन याची कल्पना येऊ शकते. त्यातही ही नोकरी केंद्र सरकारीच असेल दुधात साखर. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर आता ती संधी आली आहे. केंद्र सरकारमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅबिनेट सचिवालयाने उप क्षेत्र अधिकारी पदाच्या 38 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2022 आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट cabsec.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. फ्रेशर्स उमेदवारांनो, Accenture कंपनीत बंपर Vacancy; आजच करा अप्लाय काय पात्रता आवश्यक आहे? अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराला संबंधित भाषेतील पदवीधर असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित विषयात दोन वर्षांचा डिप्लोमा असावा. तसेच, तुम्हाला स्थानिक भाषेवर चांगले प्रभुत्व असले पाहिजे. कृपया लक्षात घ्या की उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. तुम्हालाही Freelancing जॉब्स करायचे आहेत? मग ‘या’ टॉप वेबसाईट्सवर करा काम पगार किती असेल? या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44,900 रुपये वेतन दिले जाईल. या पदाच्या भरतीसाठी 200 गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा 4 तासांची असेल. परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







