जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: नक्की कोण असतात ब्लॉकचेन डेव्हलपर्स? असं करा यात करिअर; लाखो रुपये मिळेल पगार

Career Tips: नक्की कोण असतात ब्लॉकचेन डेव्हलपर्स? असं करा यात करिअर; लाखो रुपये मिळेल पगार

असं करा यात करिअर

असं करा यात करिअर

आज आम्ही तुम्हाला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नक्की आहे तरी काय? आणि यामध्ये करिअर करण्यासाठी काय पात्र असणं आवश्यक आहे. हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑक्टोबर: गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सर्वांचं लक्ष एका नवीन तंत्रज्ञानाकडे वळलं आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉकचेन. ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) हे वेगाने विकसित झालेलं, पुढच्या पिढीचं एक आश्वासक आणि क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे. आपला व्यवसाय कशा प्रकारे काम करतो याची पूर्ण प्रक्रियाच यामुळे बदलली आहे. म्हणूनच या क्षेत्रात आता करिअर स्कोप वाढत चालला आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नक्की आहे तरी काय? आणि यामध्ये करिअर करण्यासाठी काय पात्र असणं आवश्यक आहे. हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नक्की कोण असतात ब्लॉकचेन डेव्हलपर्स? ब्लॉकचेन प्रोटोकॉल आणि आर्किटेक्चरसाठी विकेंद्रित अ‍ॅप्स तयार आणि ऑप्टिमाइज करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच ब्लॉकचेन डेव्हलपर्स. ब्लॉकचेन प्रोटोकॉलवर आधारित अल्गोरिदम विकसित करणं, प्रोग्राम करणं आणि ऑप्टिमाइझ करणं आणि ब्लॉकचेन नोड्सवर चालविणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. सोबतच, त्यांना 3D मॉडेलिंग आणि 3D कंटेंट डेव्हलपिंगचं ज्ञानही असते. एका अर्थाने ब्लॉकचेन डेव्हलपर्स हे व्हिडिओ गेम डेव्हलपर्सप्रमाणेच काम करतात. एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवा करिअर; स्वतःलाच गिफ्ट करा ‘हे’ टॉप IIT मधील Courses

अर्थात, ब्लॉकचेन डेव्हलपर्सनी तयार केलेली अ‍ॅप्स इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत थोडी वेगळ्या प्रकारे काम करतात. उदाहरणार्थ, ते इंटरनेटच्या विकेंद्रित आवृत्तीवर काम करतात. ती आवृत्ती वेब 3.0 म्हणून ओळखली जाते. यामुळे ब्लॉकचेन डेव्हलपर्सची भूमिका थोडी किचकट आणि आव्हानात्मक होते. कारण त्यांचं कार्य सगळे वापरत असलेल्या सोप्या वेबच्या नाही, तर वेब 3.0 च्या मानकांशी संबंधित आहे. यामुळेच ब्लॉकचेन डेव्हलपर्सना विशेष कौशल्यांची गरज भासते.

करिअर स्कोप कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर्स : यांचा संबंध प्रामुख्याने ब्लॉकचेनच्या अगदी मुळाशी येतो. ब्लॉकचेन प्रोटोकॉल आणि नेटवर्क आर्किटेक्चरची रचना तयार करणं, विकसित करणं आणि त्यांचं मॉनिटरिंग करणं हा त्यांच्या कामाचा भाग असतो. सोबतच, Consensun Mechanisms आणि प्रोटोकॉलची देखरेख करणं, विविध फीचर्सची अंमलबजावणी करणं ही कामंदेखील कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर्स करतात. जॉब अचानक सोडण्याचा विचार येतोय? जरा थांबा; निर्णय घेण्याआधी आधी या गोष्टी वाचा

ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्स : यांचा संबंध ब्लॉकचेनच्या थोड्या वरच्या स्तरासोबत येतो. ब्लॉकचेन डेव्हलपर्सनी तयार केलेल्या अल्गोरिदमची अंमलबजावणी करणं आणि त्यांचा अ‍ॅप्लिकेशनमध्ये समावेश करणं, ब्लॉकचेन यंत्रणेवर चालणारे विकेंद्रित अनुप्रयोग विकसित करणं, एपीआय विकसित करणे, अ‍ॅपच्या फ्रंटएंड आणि बॅकएंडची रचना आणि विकास करणं इत्यादी गोष्टी करण्याची जबाबदारी ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची असते.

ही पात्रता असणं आवश्यक ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भरपूर लक्षणीय स्किल गॅप्स आहेत आणि त्यामुळेच ब्लॉकचेन डेव्हलपर्सना भरपूर मागणी आहे. याला कारण म्हणजे, ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी या क्षेत्रातल्या व्यक्तीकडे भरपूर ज्ञान आणि कौशल्य असण्याची गरज आहे. शिवाय, बऱ्याच पूर्व-आवश्यकताही आहेत. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठीचा संपूर्ण रोडमॅप पुढे दिला आहे. IT Jobs म्हंटलं की Coding आलंच; मुलाखतीला जात असाल तर ‘या’ चुका करू नका

पहिला टप्पा आहे शिक्षण. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी कम्प्युटर सायन्स किंवा आयटीची पार्श्वभूमी असणं गरजेचं आहे. तसंच, इतर डेव्हलपर्सप्रमाणे C++, जावा, पायथन अशा बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम यांचीदेखील माहिती हवी. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीकडे उत्तम लॉजिकल ज्ञान आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात