मुंबई, 16 मार्च: अनेक तरुण-तरुणी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच सैन्यदल, सुरक्षा दलात भरती होऊन देशसेवा करण्याचंदेखील अनेकांचं स्वप्न असतं. तुम्हीदेखील सरकारी नोकरी आणि सुरक्षा दलात भरती होण्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दलात असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) या पदासाठी एक जागा भरण्यात येत आहे. या पदासाठी महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात. मात्र या पदासाठी काही निकष आहेत, त्याविषयी जाणून घेऊया. `स्टडी कॅफे डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे. भारतीय नागरिक या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठीची अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2023 पासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 14 एप्रिल 2023 पर्यंत आहे. तुम्हालाही परदेशात जॉब हवाय ना? ‘या’ महिलेनं आतापर्यंत 3000 लोकांना दिलीये नोकरी; तुम्हीही साधा संपर्क या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय शेवटच्या तारखेपर्यंत 35 पेक्षा जास्त नसावं. तसंच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयात कमाल तीन वर्षांची सवलत असेल. ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी (ओबीसी श्रेणी) अंतिम तारखेपर्यंत तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी नियमित आणि सातत्याने सेवा दिली आहे त्यांना वयात आठ वर्षापर्यंत सवलत असेल. तसेच 1984 मधील जातीय दंगली आणि 2002 मधील गुजरातमधील दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची मुलं किंवा कुटुंबातील सदस्याला (ओबीसी) वयात आठ वर्षापर्यंत सवलत असेल. ना कोणती परीक्षा ना टेस्ट, भारत सरकारच्या या विभागामध्ये थेट मिळेल नोकरी; ही पात्रता असणं आवश्यक असिस्टंट कमांडंट या पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी किंवा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्सचे सहयोगी सदस्य अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मटेरियल मॅनेजमेंटमध्ये एमबीए केलेलं असावं किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्टोअर मॅनेजमेंट किंवा मटेरियल मॅनेजमेंटमध्ये एक वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला असावा. मान्यताप्राप्त संस्थेकडून लॉजिस्टिक्स किंवा एव्हिएशन संबंधित क्षेत्रात एक वर्ष काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराचा प्राधान्याने विचार केला जाईल. (जर उमेदवार योग्य असेल तर ही पात्रता केंद्र सरकारच्या अधिकारानुसार शिथिल असेल.) 1-2 नव्हे ‘या’ गावातील सर्वच जण आहेत YouTuber; नोकरी नाही तर व्हिडीओ बनवून कमवतात पैसे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशनुसार, असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी बीएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करावा. इच्छुक उमेदवाराकडून परीक्षा शुल्कापोटी 400 रुपये आणि सेवा शुल्क म्हणून 47 रुपये भरावे लागतील. या शुल्कात एससी आणि एसटी प्रवर्ग तसेच महिला उमेदवारांना सवलत मिळेल.
या पदासाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, इंटरव्ह्यु, डॉक्युमेट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणीच्याआधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी बीएसएफच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.