मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Best Books: भारतातील काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'ही' पुस्तकं नक्की येतील कामी

Best Books: भारतातील काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'ही' पुस्तकं नक्की येतील कामी

जाणून घेऊया या पुस्तकांबद्दल

जाणून घेऊया या पुस्तकांबद्दल

ही पुस्तकं तुम्हाला CGL, NDA, CLAT, GATE, NEET, CAT, MAT, SSC, IAS यापैकी कोणत्याही परीक्षांसाठी कामी येऊ शकतात.

मुंबई, 22 नोव्हेंबर: आपल्या देशात जितकं महत्त्वं इतर कोणत्याही प्रतिष्ठित नोकरीला नाही तितकं महत्त्वं सरकारी नोकरीला (Government Jobs) आहे. म्हणूनच दरवर्षी लाखो विद्यार्थी देशातील निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा (All Competitive Exams in India) देतात. काही विद्यार्थी शिक्षणासाठी तर काही सरकारी नोकरीसाठी या परीक्षा देतात. विद्यार्थ्यांची मोठी संख्या बघून आता देशात लाखो कोचिंग इन्स्टिटयूटही (Coaching Institute for Competitive Exams) सुरु झाले आहेत. मात्र प्रत्येक विद्यार्थी कोचिंगमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकेलच असं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या विषयांसाठी अनेक पुस्तकं वाचावी (Best Books for Competitive Exams Preparation) लागतात. पण ही पुस्तकं नेमकी कोणती याबाबत नेहमीच संभ्रम असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या पुस्तकांबद्दल (Books Important for Competitive Exams) सांगणार आहोत जी तुम्हाला स्पर्धा परीक्षा देताना नक्की कामी येतील.

ही पुस्तकं तुम्हाला CGL, NDA, CLAT, GATE, NEET, CAT, MAT, SSC, IAS यापैकी कोणत्याही परीक्षांसाठी कामी येऊ शकतात. चला तर जाणून घेऊया अशा काही पुस्तकांबद्दल.

जनरल इंग्लिश फॉर ऑल कॉम्पीटीटिव्ह एक्साम्स (General English for All Competitive Exams)

आपल्या देशातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य इंग्रजी चाचणीचा नक्कीच समावेश होतो. हे एक प्रात्यक्षिक पुस्तक आहे ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणासह तुमच्या सरावासाठी भरपूर एक्सरसाइज दिलेले आहेत. या पुस्तकात इंग्रजी व्याकरणाचे विविध नियम सोप्या उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत. विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजीची उजळणी आणि सराव करण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

ऑफिसमध्ये लवकर प्रमोशन मिळवायचं? मग ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं

फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरीथमॅटिक (Fast Track Objective Arithmetic)

ऑब्जेक्टिव्ह अरीथमॅटिकचे प्रश्न आपल्या देशातील जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये समाविष्ट केले जातात. हे पुस्तक तुमच्या योग्यतेचे कौशल्य देखील वाढवेल. या पुस्तकात RBI, SBI, IBPS PO, SSC, LIC, CDS आणि UPSC सारख्या सर्व स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. या पुस्तकात अंकगणिताच्या मूलभूत संकल्पना आणि प्रश्न सोडवण्याच्या छोट्या युक्त्या दिल्या आहेत.

ऑक्सफर्ड स्टुडंट ऍटलास फॉर इंडिया (Oxford Student Atlas for India)

हा ऍटलस आपल्या देशातील अनेक शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाच्या आवश्यकता देखील पूर्ण करतो. UPSC, राज्य लोकसेवा आयोग आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षा संस्थांद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, हे पुस्तक भारत आणि जगाच्या विविध नकाशांवर नवीनतम आणि अचूक माहिती प्रदान करते. या पुस्तकात भारतीय इतिहासाशी संबंधित 24 नकाशे आणि पर्यावरणाशी संबंधित 8 नकाशे आहेत. याशिवाय जागतिक इतिहास, जागतिक वेळ क्षेत्र नकाशे आणि जागतिक भौगोलिक नकाशे यांचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

First published:

Tags: Career